रविवार, २९ मार्च, २०२०

*कोरोना, कोरोना*

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

कोरोना, कोरोना
कुणाचा हा गुन्हा
समजेना मना
विचारू मी कुणा ll१ll

विषाणू हा (व्हायरस) नवा
जीवघेणा आला
जनमन कसा
कासावीस झाला II२II

दवाखाना हेची
मंदिर, राऊळे
उपचारा तेथे
वळती पाऊले ll३ll

वैद्य नि रक्षक
रक्षणास सज्ज
प्रशासन दक्ष
रातदिन आज ll४ll

ओसाड मंदिरे
देव नाही तेथे
राबतो बाहेरी
रुग्ण असे जेथे ll५ll

जाईल संकट
मनी हा विश्वास
पाळूया निर्देश
गाडण्या राक्षस ll६ll

शिस्त हाच कणा
आरोग्याच्या धना
ना आगाऊपणा
नियम तोडण्या ll७ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

गुरुवार, २६ मार्च, २०२०

*रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे व ती वाढवण्याचे उपाय*

*प्रतावना:-*
कोरोना  व्हायरसच्या प्रादुर्भावाचा निमित्ताने आजकाल रोगप्रतिकारक शक्ती अर्थात immunity याबाबत दररोज वाचायला व ऐकायला मिळत आहे. कुठलाही प्रादुर्भाव अथवा रोगराई यांचा होणारा परिणाम हा ती व्यक्ती किती सशक्त अर्थात रोगप्रतिकारक आहे, यावर अवलंबून असते.
आरोग्यदायी, आनंदमय मजेत जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला कळत नकळत आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवावी लागते.  परंतू हे आपण समजतो तेव्हढं सोपे काम मुळीच नाही. धक्काधक्कीच्या व्यस्त दिनक्रमात आपले स्वतःकडे दुर्लक्ष होते. आणि आपण अप्रत्यक्ष आजारपणाला निमंत्रण देतो. प्रथमतः रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? ते समजावून घेवूया.
*रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे कोणत्याही शारीरिक रोगास प्रतिकार  किंवा रोग होऊ नये यासाठी उपयुक्त असा प्राण्यांच्या तथा व्यक्तीचा अंगभूत गुण होय.*
दोनवेळच्या अन्नपाण्याची भ्रांत मिटवण्यासाठी या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला कामधंदा करावाच लागतो. मग ती व्यक्ती कोणीही असो.  नोकरदार, कारखानदार, कामगार, गृहिणी किंवा अगदी क्षुल्लक भिकारीही.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे व ती वाढवण्याचे उपाय याबाबतची मिमांसा खालीलप्रमाणे करता यईल.

*रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे,*
अनेकजण सतत आजारी पडतात. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, पडसे, खोकला, ताप या समस्यांमुळे नेहमीच बेजार असतात. याला कारण त्या व्यक्तीची कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती होय. याला कारण आहेत, बदलते जीवनमान, बदलते वातावरण, वाढते प्रदूषण व शहरीकरण, खाण्यापिण्याच्या बदलत्या व चुकीच्या सवयी.
१) *बदलते जीवनमान:-*
आजकाल लोकं रात्री जास्त वेळ जागरण करतात. काहींना बैठे काम असते. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. शिफ्ट अर्थात पाळीच्या (ड्युटी) कामाच्या वेळा असतात.
त्यामळे जेवण, नाष्ट्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. पूर्वी लोकं रात्री लवकर झोपायचे, सकाळी पहाटे उठायचे. सकाळच्या शुद्ध वातावरणात कामं, व्यायाम करायचे. आजच्या बदलत्या जीवनमानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
२) *वाढते प्रदूषण व औद्योगिकरण:-*
जीवनमान समृद्ध होण्यासाठी औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. रहिवाशी तसेच उद्योग धंद्यांसाठी वृक्षतोड झाली. कालांतराने परिचर संस्था बिघडली.  जल, वायू, ध्वनी प्रदूषण वाढले. रोजच्या खाण्यातील अन्न पदार्थ, पाणी प्रदूषणामुळे दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे समुद्रातील जलचर धोक्यात येत असून तेच जलचर मनुष्य खात असल्याने रोगराई वाढते. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
३) *वाढते शहरीकरण:-*
औद्योगिकरणामुळे  रोजगारा संधी वाढतात. लोकं शहरात येतात मात्र अर्थार्जनाच्या मागे लागून तथा मिळणाऱ्या कमी मोबदल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. व्यायाम नाही की चांगल्या दर्जाचे अन्न, पाणी नाही. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
४) *अमर्याद कीटकनाशकांचा वापर:-*
जास्त प्रमाणात शेतीतून उत्पादन मिळावे म्हणून अमर्याद कीटकनाशकांची फवारणी पिकांवर केली गेल्याने दैनंदिन आहारात खाल्ला जाणारा भाजीपाला, धान्यातील विषारी अवशेष शरीरात वाढत जाऊन रोगराई वाढवतात. असे अन्न पदार्थ आरोग्यवर वाईट व दूरगामी परिणाम करत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
५) *नशील्या पदार्थांचे सेवन*:-
चैन, हौस, ऐशो आराम, मजा, उत्सुकता यामुळे बऱ्याच व्यक्ती नशीले पदार्थ उदा. बिडी, सिगारेट, तंबाखू, दारू, चरस, गांज्या यांचे सेवन करतात. हे पदार्थ आरोग्यवर अत्यंत घातक परिणाम करतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

*रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे उपाय*
फक्त सकस आहार घेतला म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे मुळीच नसते. त्यासाठी खूप जाणीवपूर्वक वागावे लागते. आपल्याला रोगांना, आजारांना तोंड दयावे लागू नये, आपली तब्येत, आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी काळजी घ्यावी लागते. आरोग्यदायी शरीर असेल तरच जीवन सुखी, समाधानी व समृद्ध बनते. सुखी जीवनासाठी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरू शकतात.
१) *नियमित व्यायाम व काम:-*
सकस आहरासोबत  नियमित शारीरिक कष्टांची तसेच व्यायामाची सुदृढ शरीरासाठी नितांत आवश्यकता असते. आपण बऱ्याचदा कष्टाची मातीकाम करणारे मजूर आपल्यापेक्षा अधिक मजबूत असल्याचे अनुभवतो.  व्यायामाने, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे व कष्टाच्या अंगमेहनतीच्या कामामुळे आपल्या शरीरातील स्नायू व हाडे मजबूत होतात. म्हणून नियमित व्यायामाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
२) *पौष्टिक आहार घेणे*
आजकालच्या फास्ट युगात ऑर्डर दिली का अली बाबाच्या गुहेसारखं हवं ते तात्काळ उपलब्ध होते. गुगल बाबा आपल्या सेवेसाठी सदैव्य हजर असतो. फास्टफूड, जंकफूड चुटकीसरशी समोर खायला, जिभेचे चोचले पुरवायला हजर. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. फास्टफूड, जंकफूड रोगवर्धक असतात. त्याऐवजी घरातील ताजे स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन केलेले केव्हाही उत्तम. शिवाय कार्बोनेटेड शीतपेय आरोग्यासाठी अपायकारक असून त्याऐवजी आरोग्यदायी लिंबू सरबत, उसाचा रस, फळांचा रस यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
३) *आनंदी राहणे:-*
राग, द्वेश, मत्सर, काळजी, चिंता हे चांगल्या आरोग्याचे शत्रू असल्याने आनंदी, हसत खेळत, तणावमुक्त वातावरणात खाणे, पिणे, राहणे केव्हाही चांगले. चांगली पुस्तके वाचावी, चुटकुले, ऐकावे, वाचावे. परिणामी शरीरातील ग्रंथी योग्य रित्या स्रावल्याने आरोग्य चांगले राहते तथा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
४) *पौष्टिक नैसर्गिक ताजा व शुद्ध आहार विहार*
प्रदूषण मुक्त वातावरणात वावर असणे केव्हाही उत्तम. त्याचप्रमाणे रोजच्या आहारात कांदा, लसूण, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच दही, तूप, लोणी, ताक, ओट्स, लिंबू, आवळा, संत्री, सफरचंद इत्यादींचा समावेश केल्याने संक्रमित रोगांपासून बचाव होतो. चहा कमी प्यावा. तळलेले पदार्थ शरीरास घातकच. न उकडता शिजवलेले अन्न पदार्थ खाणे योग्य. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास निश्चितच मदत होते.

लवकर उठावे, लवकर झोपावे
करारी असावे उगा रोगट नसावे
ताजे शुद्ध खावे, प्यावे, शिळेही टाळावे
प्रकृती जपण्या, हसावे  आणि खेळावे

केवळ काळजी करण्यापेक्षा उत्तम आहार, विहार, नियमित व्यायाम असे किरकोळ सहज साध्य नियम पाळले तर आपले आरोग्य चांगले राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपलं आपल्या अनमोल जीवनाचा आयुष्यभर मनमोकळा आनंद घेऊ शकतो. त्यामळे रोगप्रतिकारक शक्ती ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तर मग मंडळी उत्तम आरोग्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

*सोमनाथ आवडाजी पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

*बालकविता:-खारूताई*

खारूताई, खारूताई
काय बाई तुला घाई
भुरभर, सरसर
वर जाई, खाली येई ll१ll

कुरतडत असते
सदानकदा काय तू
दात तुझे हाय फाय
कशी थकत नाय तू II२II

पिटुकली, चिंटूकली
लगबग लपण्याची
कला कशी ठाव तुला
अगो बाई वळण्याची ll३ll

मऊ, मऊ घरट्यात
पिल्लं तुझी खेळतात
दार लावलं का नाही
घोर नको काळजात ll४ll

अंगणात आराधरी
रोज येणा खेळायला
कॅडबरी, कुरकुरे
तुला देईल खायला ll५ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

*अष्टाक्षरी रचना:-पापडाचा आज बेत*

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

कोरोनाची आली साथ
राजा, रानी या घरात
पापडाचा आज बेत
पोर सोर उत्साहात ll१ll

डाळ आली किलो, किलो
मसाल्यात पीठ न्हाले
पाटा, वरवंटा आज
कधी नव्हे कामी आले II२II

पोळपाट, लाटणे हे
एकमेका साथ देई
तेल, पीठ सोबतीला
कसे एकजीव होई ll३ll

देतो फोडून मी लाट्या
तू ग! लाट गोल, गोल
खरे कसब बाईचे
जगी नाही ज्याचे मोल ll४ll

चवदार पापडाने
सान, थोर एक होई
कोरोनाच्या निमित्ताने
राजा, राणी गाणं गाई ll५ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

गुरुवार, १९ मार्च, २०२०

*बाल गीत:-चला मुलांनो शिकूया आज जीवनाची शाळा*

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

चला मुलांनो शिकूया
आज जीवनाची शाळा
वृक्ष, वेली ही पाखरे
पहा गुरे झाली गोळा llध्रुll

रिमझिम पाऊसाने
आली अवणीला लाली
नटूनी हिरवाईने
लाज दाटे तिच्या गाली
नव निर्मितीची जादू
पाही भास्कर भोळा ll१ll

वारा घाली शिळ कानी
पावा वाजविला कोणी
दूर कोकीळेची गाणी
मिठू बोले हा गाऊनी
झर, झर वाहे झरा
गिरी शिखरांचा मेळा ll२ll

धूम ठोकी कसा ससा
श्वास घेई मासा कसा
हाथी काढी उठ बशा
सिंहा शिकारीची नशा
ग्रह, ताऱ्यांचा या फेऱ्या
अचूक दावती वेळा ll३ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

बुधवार, १८ मार्च, २०२०

कविता:-मूल हसतं घर सजतं

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
मूल हसतं घर सजतं
मूल म्हणजे फुल असतं ll१ll

व्यापून कळत नकळत
फुल असतं दरवळतं ll२ll

मोहर येई चैत्र पालवी
बहर येई सर हळवी / शिन घालवी ll३ll

कृष्ण पावली स्वप्न सजती
लिला असली लाख जगती ll४ll

कन्यारत्न वा वंशाची वेल
भेट जगास ही अनमोल ll५ll

सुखाची पेटी रंग, रंगोटी
आजी, आजोबा नातवांसाठी ll६ll

गुज गोष्टी नि वात्सल्य ओटी
पुरून उरं संतती साठी ll७ll

परसदारी आनंद वारी
उधाण लेल्या आप्तेष्टा भारी ll८ll

बोल बोबडे बाल घेवडे
रंग उधळे साजं रुपडे ll९ll

दोन जीवांचा संसार खरा
खरा खुरा हा स्वर्गच घरा ll१०ll

मुला फुलांचा जीवन झुला
सफल होई आयुष्य तुला ll११ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

अभंग:-नयन

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

नयन बोलती l सुलभ जगती ll
होतसे प्रगती l वाचकाची ll१ll

नयन असे हे l नयन तसे हे ll
नयन कसे हे l गूढ म्हणा ll२ll

नयन वाटाडे l दिशा दावतसे ll
मन फसतसे l नयनाला ll३ll

नयनी जे दिसे l रडके, हसरे ll
असे तेच खरे l जगा मधी ll४ll

नयनी अश्रू वा l नकोच वेदना ll
हव्या संवेदना l जना मना ll५ll

नयन सज्जन l नसावे दुर्जन ll
सत्याचे भजन l रात दिनी ll६ll

सुखाची वर्गणी l नयन पर्वणी ll
आंनद जीवनी l खरोखरी ll७ll

नयन नसता l जीवन नरक ll
नयन अरक l श्वासांचा हो ll८ll

नयन जिज्ञासा l नयन आरसा ll
नयन वारसा l सोमनाथा ll९ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

*गीत:-दोघं जोडीनं आज खेळू रंगपंचमी

*गीत:-दोघं जोडीनं आज खेळू रंगपंचमी*
कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

तो/ती:-दोघं जोडीनं आज, खेळू रंग पंचमी
प्रेम रंगात रंगण्याची मी देतो/देते हमी
 llध्रुll

तो:-माझा रंग घे तुला, तुझा रंग दे मला
ती:-तुझा संग दे मला, माझं अंग हे झुला
तो:-चार चौघात खेळू, चल प्रेमानं रमी ll१ll

ती:-पिचकारी तू देना, कृष्णा कान्हा तू वाली
तो:-माझी राधा तू झाली, झाली बाधा ग! गाली
ती:-हार हातांचा घाल, तुझ्या ओठी साज मी ll२ll

तो/ती:-हा उधळला रंग, मनी होऊन दंग
सप्त रंगात भिजं, मनं झालीय तंग
हवा पाणी हे धुंद, आता कशाची कमी ll३ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

गुरुवार, १२ मार्च, २०२०

*गीत:-बायको माझी करामती, गम्मत तुम्हा सांगू किती*

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

बायको माझी करामती, गम्मत तुम्हा सांगू किती
सुंदर नारी, दिसं भारी दुर्गा बाई जिती जागती llध्रुll

भटार डोळी साधी भोळी, जहाल भारी हो गव्हाळी
व्हटाव कळी फटाकडी, टिकली शोभं लाल भाळी
वाघिणी गत डरकाळी निभाऊ तरी चाली रिती
ll१ll

हिरवा चुडा रान जाळी, धाक रांगडा  नरसाळी
मिठाचा खडा गोड गळा, लवंगी मिर्ची हडकुळी
खट्याळ थोडी लाडीगोडी, तिच्याच हाती माझी निती ll२ll

भार झाली हो पलंगाला, श्रीखंड पुरी जेवणाला
पाणी पुरी हवी नाश्त्याला, वाया जाई हा भाजीपाला
धुवावी लागं ताट, वाटी, सुतळी बॉम्ब वाट भिती ll३ll

राजा राणीच्या संसाराला, कळ्या, फुले आनंदाला
माहेरी जाई उत्साहाने, सासरी येई रुबाबाला
अशा देवीची मनोभावे, करतो नित्य मी आरती ll४ll