*कृपया, पूर्ण रचना वाचल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये, ही नम्र विनंती 💐सदर गीत वाचकांच्या भावनांना हात घालून काळजाला भिडणार यात शंकाच नाही. आपल्याला नेहमीच इतर लोकं सुखी भासतात. प्रत्यक्षात वास्तव वेगळच असतं. घरोघरी मातीच्या चुली असतात. कोणी सुखी कोणी दुःखी हे चालायचंच. मानवी जीवनाचं सत्य मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न 🙏🏻💐😇
कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
या दुनियेची तऱ्हा न्यारी
बिळात असतो साप रे!
दुरून डोंगर साजरे
जवळ गेलं की बाप रे! Ilध्रुII
शितल, शुभ्र चंद्रालाही
असतोच एक डाग रे!
ठेच लागता पुन्हा, पुन्हा
शहाण्यासारखा वाग रे!
विराण माळरानावरी
होती कधीतरी बाग रे! ll१ll
अमावस्येच्या काळ्या रात्री
कधी न पडे प्रकाश रे!!
चंदनाहूनी गंधित हा
जगी घामाचाच वास रे!
मुखी सुखाचा घास तरी
उरात जपतो शाप रे!
ll२ll
नसे सर्वदा कुणी सुखी
न राही दुःखाचे घाव रे
हार नको, माघार नको
घे पुढे, पुढे तू धाव रे!
चकाकणारे सदा नसे
सोन्या, चांदीचे ते माप रे! ll३ll
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा