Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
रविवार, १८ जून, २०२३
कथा:- कसोटी... A Divine Trial (©All rights reserved.)
सोमवार, १ मे, २०२३
विनम्र अभिवादन
होऊनिया गेले l राम, कृष्ण जसे ll
होते आम्हा तसे l दादा, आण्णा ll
जपली आनंदे l नाती गोती सारी ll
पंढरीचा हरी ll आप्तेष्टांना ll
सग्या सोयऱ्यात l होता मोठा मान ll
आम्हावरी ऋण l फार केले ll
सुखाचा संसार l निर्मळ आरसा ll
पिढ्यांना वारसा l निर्मियेला ll
मायेचा आगर l प्रेमाळू आधार ll
गुणांचा पाझर l आम्हापाठी ll
आभाळा एवढे l कार्य नी कर्तृत्व ll
समर्थ नेतृत्व l असे केले ll
समर्थाची केली l भक्तीही महान ll
मित्रत्वाचे धन l अर्जियले ll
अशा चरणांशी l नमते मस्तक ll
संस्कारी पुस्तक l आदराचे ll
विधिलिखित हो l जन्म, मृत्य खेळ ll
भूवरी अटळ l सर्वांसाठी ll
भावपूर्ण आज l शब्द पुष्पांजली ll
अर्पू श्रद्धांजली l मनोभावे ll
सोमनाथ आवडाजी पगार ९२७३३५७१५९
गुरुवार, १६ मार्च, २०२३
how to get duplicate marksheet from ycmou
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक (महाराष्ट्र, भारत) येथे आहे.
या विद्यापीठाच्या सर्व पदवीपूर्व आणि पदव्युत्तर
शिक्षणक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता आहे. त्यामुळे नोकरी अथवा
पुढील शिक्षणासाठी अन्य विद्यापीठांकडे उपलब्ध असलेल्या त्या शिक्षण क्रमांशी ते
पूर्णपणे समकक्ष आहेत.
नोकरी करून शिक्षण पूर्ण करायचे असल्यास YCMOU हा पुढील शिक्षण घेण्यास उत्तम पर्याय आहे. कारण विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून आपलं शिक्षण पूर्ण
केल्यानंतर विद्यापीठ विद्यार्थ्यांना मार्कशीट/ प्रमाणपत्र वितरीत करते. YCMOU ला UGC ची मान्यता असल्याने या विद्यापीठाचे प्रमाणपत्र हे ग्राह्य धरले जाते. या
प्रमाणपत्राचा वापर विद्यार्थी खाजगी किंवा सरकारी नोकरी मिळविण्यासाठी करू शकतात.
जर प्राप्त झालेले प्रमाणपत्र किंवा मार्कशीट गहाळ झाले तर ते विद्यापीठाला अर्ज करून दुय्यम अर्थात Duplicate मिळवता येते..
"परीक्षा नियंत्रक" यांना अर्ज करून या अर्जात खालील गोष्टींचा उल्लेख
करावा.
·
विद्यार्थ्याचे नाव:-
·
विद्यार्थ्याच्या आईचे नाव:-
·
परीक्षेचे नाव:-
·
उतीर्ण झाल्याचा महिना आणि
वर्ष:-
·
ज्या महाविद्यालयात प्रवेश होता
त्याचे नाव:-
·
PRN:-
·
परीक्षेचा बैठक क्रमांक (Seat No.):-
·
प्राप्त झालेले गुण :-
·
पूर्ण पत्ता:-
·
दूरध्वनी क्रमांक व ई-मेल :-
अर्जासोबत हवे असलेल्या मार्कशीट अथवा प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्थात Attested केलेली झेरोक्स कॉपी जोडावी.
हवे असलेले Duplicate Marksheet मिळवण्सायासाठी रु.100 च्या Stamp Paper वर Affidavit करून र्जासोबत जोडावे.र आहे. तसेच रु. 200 फी सुध्दा भरावी.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर लिंक search केली असता मिळाली नाही.
अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा..
पूर्ण अर्ज खालील पत्यावर पोस्टाने पाठवावा किंवा व्यक्तिश: जमा करावा.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :
उप कुलसचिव, परीक्षा कक्ष १/२/३ (लागू होईल तसे)
य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२
Deputy Registrar, Exam Section,1/2/3 (as
applicable)
Y.C.M Open University, 'Dnyangangotri',
Near Gangapur Dam, Nashik- 422222, Maharashtra
(India)
शनिवार, ४ मार्च, २०२३
संवाद काव्य:- आम्ही मुले रंगवितो स्वप्न उद्याचे जे हवे
विद्यार्थ्यांना विषय देऊन संवाद काव्य लिहण्याचा प्रश्न दिला जातो.
अशाच 'आम्ही मुले चित्र काढतो' या विषयानुसार कागदावं कल्पनांच्या (किंवा कॅनव्हास कल्पनांचा) या संवाद- अष्टाक्षरी काव्याची रचना केली आहे.
सदर काव्य रचना आपल्याला आवडल्यास, नावासह फॉरवड करावी, ही विनंती💐🙏🏻💐
टीप:- सदर काव्य रचनेतील नावे काल्पनिक आहेत...
अथर्व:
कल्पनांच्या कागदावं (कॅनव्हास कल्पनांचा)
रेखाटतो चित्र नवे
मुले आम्ही रंगवितो
स्वप्न उद्याचे जे हवे ||१||
मधुरा:
गुरुजनांची प्रेरणा
हाती ज्ञानाचा कुंचला
सरस्वतीच्या साक्षीनं
श्रीगणेशा हा रंगला ||२||
अथर्व:
अक्षरांच्या पर्वतावं
गाठू शिखरं यशाची
इंद्रधनूच्या कमानी
उजळणी पुनवेची ||३||
मधुरा:
अभ्यासाचे रंग भरू
निळे-जांभळे चित्रात
झेप घेऊ विश्वासाची
नव्या, अनोख्या क्षेत्रात ||४||
अथर्व, व मधुरा:
चित्र भासता वेगळे
नाचू लागे मनमोर
ज्ञान मंदिरी आगळे
चित्र रंगे घनघोर ||५|
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी, लेखक, युट्यूबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट. (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathpagar@yahoo.co.in
Follow/ Subscribe me on my Blog, Youtube Channel, Facebook, Whatsapp, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud, Quora...
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
कृपया,
https://youtube.com/c/SahityaTirth
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर Subscribe हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल Subscribed केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच https://somnathpagar.blogspot.com
हा Blog Follow करून Subscribe करण्यास विसरू नका. 💐🙏
तुमचे एक सब्सक्रिप्शन
हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन
Somnath Pagar Fan Club♻️
https://t.me/somnathpagarfanclub हा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा 💐
Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.💐
©®
शुक्रवार, ३ मार्च, २०२३
Scout guide laws with examples
The Scout Law is a code of conduct that serves as a guide for members of the Scout Movement. It outlines the basic values and principles that scouts should embody and strive to live up to. Here are the Scout Laws and examples of how they can be applied in everyday life:
Trustworthy: A Scout tells the truth and keeps their promises.
Example: When a scout promises to return a borrowed item to a friend, they should make sure to follow through on that promise.
Loyal: A Scout is true to their family, friends, Scout leaders, and country.
Example: A scout stands up for their friends when they are being bullied, even if it means standing alone.
Helpful: A Scout is concerned about other people and willingly helps them without expecting payment or reward.
Example: A scout offers to help a neighbor carry their groceries when they see them struggling with the bags.
Friendly: A Scout is a friend to all and is a brother or sister to every other Scout.
Example: A scout welcomes a new scout to their troop and makes an effort to get to know them.
Courteous: A Scout is polite to everyone regardless of age or position.
Example: A scout uses good manners when speaking to their elders, even if they do not know them well.
Kind: A Scout treats others as they would like to be treated.
Example: A scout offers their jacket to a friend who is cold, even if they are not close friends.
Obedient: A Scout follows the rules of their family, school, and troop. They obey the laws of their country and respect its traditions.
Example: A scout follows their parents' rules and curfew, even if they do not always agree with them.
Cheerful: A Scout looks for the bright side of life. They cheerfully do tasks that come their way and try to make others happy.
Example: A scout volunteers to help with a fundraiser even though it means giving up their Saturday.
Thrifty: A Scout works to pay their way and to help others. They save for the future and use resources wisely.
Example: A scout saves their allowance to buy a new camping stove for their troop instead of spending it on something frivolous.
Brave: A Scout faces difficult situations even if they feel afraid. They stand for what they believe in.
Example: A scout stands up to a group of peers who are engaging in harmful behavior, even if it means risking their social standing.
Clean: A Scout keeps their body and mind fit and clean. They choose the company of those who live by high standards. They help keep their home and community clean.
Example: A scout cleans up litter in their local park, even if it means getting their hands dirty.
Reverent: A Scout is reverent toward God. They are faithful in their religious duties and respect the beliefs of others.
Example: A scout attends church services regularly and shows respect for other religious practices.