जिंदगीत आली राणी माझ्या अशी
मोबाईलची न्यू रिंग टोन जशी llधृll
मधुर आवाज हा कोकीळ गाणी
करावी डाऊन लोड धून जशी
कानाशी एकूण पडलो मी फशी
इनकमिंग कॉल एकावी जशी ll१ll
आउट गोइंग तू इंकमिंग तू
माझ्या हृदयाची धडकन जशी
मोबाईल चार्जिंग तुझी खरेदी
बंद करावी कॅमेऱ्यात खुशी ll२ll
जुळला हा धागा तुझ्या जीवनाशी
मोबाईल जसा राही ग! कानाशी
प्नणयाने धुंद जवानी हि अशी
नित्य रात्र मधु चंद्राची जशी ll३ll
सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी,लेखक, (MSRA, MABMCM) मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Find me on my Blog, Whatsapp, Telegram, Facebook, Twitter, Linkedin, Instagram, Youtube, Sound Cloud.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा