अधिक माहितीसाठी कृपया विडिओ पहा:- https://www.youtube.com/watch?v=V2WjVvP77XQ
सर्वप्रथम browser च्या search bar मध्ये barti.maharashtra.gov.in
असे type करा.
Barti ची website म्हणजे संकेतस्थळ open होईल. आणि समोर
दोन पर्याय आपल्याला दिसतील.
बार्टी संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा CLICK HERE TO ENTER BARTI WEBSITE
BARTI
WEBSITE जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली २ साठी येथे क्लिक करा- CLICK HERE TO
ENTER CCVIS PHASE-2 WEBSITE
CCVIS WEBSITEयापैकी आपल्याला जात पडताळणी अर्थात Caste Certificate च्या
Validity साठी
Online अर्ज करायचा असल्याने CCVIS Website या नावावर click केल्यावर BARTI ची
website open होईल.
BARTI अर्थात Dr. Babasaheb Ambedkar Research and Training
Institute म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
होय (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाची हि स्वायत्त संस्था आहे ) (An Autonomous Institute of the
Department of Social Justice and Special Assistance, Government of Maharashtra
या website वर Caste Certificate Verification Information
System (अर्थात CCVIS) तसेच Online
Application for Caste Validity Certificate असे स्पष्ट नमूद केले
आहे.
होम पेजवर अर्जदाराच्या
मदतीसाठी
·
Important Notice
· For
Office Use इत्यादी options दिलेले आहेत. या option वर क्लिक केल्यावर आवश्यक अशी माहिती अर्जदाराला
मिळू शकते.
Already Registered असल्यास Already Registered? Login Here वर क्लिक करून लॉगीन करता येते.
ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करून जाती प्रमाणपत्र तपासणीसाठी अर्ज सादर
करण्यासाठी अर्जदारास सॉफ्टवेअरमध्ये रजीस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्जदाराकडे
खालील किमान दोन बाबी असणे आवश्यक आहे.
1. ई-मेल खाते म्हणजेच ई-मेल आयडी व
2. मोबाईल नंबर.
(जर तुम्ही यापूर्वी या website वर Registered असाल
तर login करा नाहीतर प्रथमच हि website वापरत असाल तर New User, Register here या
नावावर click करून registration करा.)
अर्जदाराने आपली माहिती जसे पूर्ण नाव, स्व:ताचा email- id, मोबईल
क्रमांक इत्यादी माहिती अचूक भरावी. अर्जदारास त्याच्या अर्जाच्या सद्यस्थितीची
माहिती वेळोवेळी SMS ने कळवण्यात येते. सर्व माहिती अचूक असल्याची
खात्री करणे फार आवश्यक आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे enter केलेला password व्यवस्थित
लक्षात ठेवावा. किंवा लिहून ठेवावा.
Verification साठी अर्जदाराच्या मोबाईलवर OTP येतो तो enter
करून VERIFY करावा. कॅपचा ENTER करून सर्व माहिती अचूक भरली असल्याची खात्री
केल्यावरच माहिती submitt करावी.
Thank you for Registration, Please verify your email and proceed
for login असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. आपण आता Email verify करूया. यानंतर
आपला email verify झाल्यावर Click here to login या नावावर click करून
अर्जदार जात पडताळणीचा अर्ज प्रत्यक्ष भरायला सुरवात करू शकतो.
Education, Election, Service, other इत्यादी कारणांसाठी नागरिक जात
पडताळणी अर्थात Caste Validity Certificate साठी अर्ज करू शकता.
प्रत्येक कारणासाठी वेगवेगळे फॉर्म असतात. जसे EDUCATTION साठी
(1. EDUCATTION
2. ELECTION
3. SERVICE
4. OTHERS
अर्जदाराने अर्ज
भरायला सुरवात करण्यापूर्वी Website वरील User Manual व्यवस्थित वाचून घ्यावं
म्हणजे चूक होणार नाही. अर्जदाराने आपला User name जो
अर्जदाराचा email-id असतो व password enter करून अर्ज भरायला सुरवात करावी.
Login केल्यावर अर्जदाराच्या नावासह webpage open होईल.
Terms & Conditions पाहून I agree वर
click केलं कि Education, Election, Service, other यापैकी ज्या कारणासाठी जात
पडताळणी करावयाची आहे त्या नावावर क्लिक करून माहिती Submitt करावी. (अर्जदार विद्यार्थी असल्यास Education Select करा.)
त्यानंतर Purpose of Scrutiny जसे Professional
Education after 10th/ SSC Select केल्यावर कोर्स निवड
करून माहिती submitt करा.
महत्वाच्या सूचना:-
१)
अनुसूचित जातीचा दावा असल्यास १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा जातीचा पुरावा असणे आवश्यक
आहे.
२)
विमुक्त जाती/ भटक्या जमाती यांच्याकरिता २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचा जातीचा
पुरावा असणे आवश्यक आहे.
३)
इतर मगर वर्ग व विशेष मागास वर्ग प्रवर्गासाठी १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचा जातीचा
पुरावा असणे आवश्यक आहे.
४)
त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरिता झालेल्या अर्जदारांसाठी वर
नमूद केलेल्या कालावधीपासून वास्तव्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
५)
वरील तारखेनंतर इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरिता झालेल्या व ज्यांचे जात
प्रमाणपत्र स्थलांतरीत नमुन्यात आहे त्यांनी समितीकडे अर्ज करू नये.
अर्जदाराने सॉफ्टवेअरमध्ये रजीस्ट्रेशन करून झाल्यावर
प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुरुवात करण्यापूवी त्याच्याकडे दोन बाबी असणे आवश्यक आहे.
1. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना महाविद्यालयाने दिलेला
जनरल रजीस्ट्टर नंबर/परमनंन्ट रजीस्ट्टर नंबर.
2. महाविद्यालयाचे आयडेंटीटीकार्ड (ज्यात अर्जदाराचा वर्ग, तुकडी, रोल नंबर, या बाबींचा उल्लेख असेल.)
आपण भरलेली माहिती समोर स्क्रीनवर दिसेल ती वाचून, तपासून घ्या.
अर्जदाराचा आधार क्रमांक, जन्म दिनांक, जन्माचे ठिकाण, Category,
जात प्रमाणपत्राचा क्रमांक, जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे पद जसे
Sub Divisional Officer, Tahasildar & Executive Magistrate, जिल्हा, इत्यादी
सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे अर्थात पुराव्यांची यादी स्क्रीनवर
दिसेल ती सर्व पुरावे SCAN करून उपलोड करावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपे : अर्ज भरतांना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
हाताशी ठेवावीत. या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती Attested असाव्यात.
नातेवाइकांची कागदपत्रे : अर्जदार
त्याच्या जातीच्या दाव्याच्या पृष्टयर्थ्य त्याच्या नातेवाइकांची कागदपत्रे जोडू शकतो
ते नातेवाइक म्हणजे, अर्जदाराचे वडील, काका, आजोबा, आत्या, चुलत आजोबा,
चुलत काका, अर्जदाराचे भाऊ, बहिण, चुलत भाऊ, चुलत बहिण.
कागदपत्रांचे
प्रकार : अर्जासोबत अर्जदार खालील प्रकारची कागदपत्रे जोडू
शकतो :
१. प्राथमिक शाळा
सोडल्याचा दाखला
२. माध्यमिक
शाळा सोडल्याचा दाखला
३. कॉलेज सोडल्याचा
दाखला
४. प्राथमिक
शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
५. माध्यमिक
शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
६. जन्म, मृत्यू
नोंदवहीचा उतारा
७. कोतवाल नोंदवहीचा / राष्ट्रीयत्वचा नोंदवहीचा उतारा
८. जमिनीचा ७/१२
चा उतारा
९. सेल डीड / महसूल विभागाकडील कागदपत्रे
१०. नावामध्ये / आडनावामध्ये बदल यासंबंधीचे राजपत्र
११. जातीचे प्रमाणपत्र
१२.
सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा उतारा
१३ जात वैधता प्रमाणपत्र
१४. वारसा हक्क
प्रमाणपत्र
अर्जासोबत जोडावयाच्या
सर्व कागदपत्रांवर, ती ज्या व्यक्तीची
असतील असतील त्या व्यक्तीशी असलेले अर्जदाराचे नाते लिहावे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे देव, देवी माहिती हवेत. मातृभाषा निवडावी,
अर्जदाराच्या नात्यातील पाच आडनावे नमूद करावीत. क्वचित प्रसंगी सर्व नातेवाइकांची
आडनावे सारखी असू शकतात, अशा वेळी स्क्रीनवरील सर्व टेक्स्ट
बॉक्स मध्ये एकच आडनाव टाईप करावे. सर्व माहिती भरून सेव करावी.
त्यानंतरच पुढील माहिती भरावी.
Compulsary Documents to Be Attached
1. Original Caste Certificate of the Applicant
2. Certified Copy of Caste Certificate of the
Applicant
3. Original Affidavit (In Specimen Form 3 Rule
- 4(1))
4. Original Affidavit (In Specimen Form 17
Rule - 14)
5. Certificate by the Principal of College (As
per the last para of FORM-16,Rule–14)
6. Attested Xerox copy of identity card issued
by the college
आवश्यक प्रमाणपत्र व शपथपत्र format
download
करून ती तयार करावीत.
सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य मार्गाने मिळवलेले व खरे पुरावेच उपलोड
करावेत
यानंतर Applicants information, Applicants address, Applicants education
details, Family details, Family migration details, Family caste validity details हि
सर्व माहिती अचूक भरून documents upload करावेत.
Print
Application Form:- या बटनावर क्लिक केल्यावर अर्जदाराने भरलेल्या माहीतीच्या
आधारे अर्जदाराचा जाती प्रमाणपत्र तपासणीसाठीचा
अर्ज तयार होवून संग़णकाच्या स्क्रीनवर दिसेल. सदर अर्जाची प्रिंट
काढावी.
अर्जाच्या
शेवटच्या तीन पानांवर अनूक्रमे कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून घ्यावयाचे प्रमाणपत्राचा नमुना, व दोन स्वतंत्र पानांवर दोन शपथपत्रांचे नमुने असतील. सदर नमुन्यांचा वापर करून आवश्यक असे प्रमाणपत्र व शपथपत्र तयार करावीत. तयार झालेल्या
अर्जाची तपासणी करावी. जर त्यात काही चूका असतील तर
आवश्यक असे बदल Update
Application या ऑप्शनचा वापर करून चूकांची दुरुस्ती करून
घ्यावी.
अर्जदाराने सॉफ्टवेअरचा वापर करून Online
भरलेल्या त्याच्या जाती प्रमाणपत्र तपासणीसाठीचा अर्ज व Application Slip च्या दोन प्रिंट काढावयात. अर्जावर Application Slip जोडावी, अर्जामध्ये ज्या क्रमाने कागदपत्रांची यादी
असेल त्याप्रमाणे अर्जास सर्व कागदपत्रे जोडून, अर्जावर ज्या
समीतीचे नाव व पत्ता आहे त्या समीतीकडे अर्ज सादर केल्यावर, अर्जदाराच्या
ई-मेल आयडीवर त्याच्या अर्जावर समीती मार्फत केलेली कार्यवाही
कळवणारे ई-मेल सॉफ्टवेअर मार्फत पाठववण्यात येतात.
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी, लेखक (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, Whatsapp, YouTube, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ २.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिष ४.मराठी साहित्य परिषद
💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
Bottom of Form