मुषक वाहना, शिव पार्वती सुता,
सिद्धी विनायका, ओमकार स्वरुपा
सुख शांती लाभू दे, लाडक्या भक्ता,
मंगलमुर्ती मोरया, गजानना ,
जय देव, जय देव, जय बाप्पा गणपती
तुज वंदिता होई इच्छा पुर्ती II धृ . II
गळा सुवर्ण माळा, कुंडले कानी,
मानव रूप शरीर, गजमुखी,
पिवळा पितांबर, दिसे शोभूनी,
सर्वांगी रक्त चंदनाची उटी,
हिरे रत्नानानी जडित, मुकुट मस्तकी
पसरली जगभर तुझीच कीर्ती II 1 II
जय देव, जय देव, जय बाप्पा गणपती
विघ्नहरा, करूणा, दया सागरा,
लंबोदरा, चराचरी सामावला,
संपती, संतती, बुद्धी, मोक्ष दाता,
दिव्य दर्शन देतसे सोमनाथा ,
अग्र पूजेचा मान, गणेश बाप्पा,
तुला देवांमध्ये तेहतीस कोटी II २ II
जय देव, जय देव, जय बाप्पा गणपती
सोमनाथ आ. पगार
नाशिक
मो. ९२७३३५७१५९