आजच्या दै . महाराष्ट्र टाइम्समध्ये काल रविवार दि . २ सप्टे . २०१२
रोजी सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात नाशिकच्या काव्य मंचच्या ९ व्या वर्धापन
दिनी संपन्न झालेल्या काव्यवाचन कार्यक्रमाच्या बातमीत माझ्या ' आज जीवनात आली सुखाची पहाट ' या कवितेचा उल्लेख आला आहे।
सदर कविता माझ्या मित्रांसाठी सादर करत आहे
आज माझ्या जिवनात
सदर कविता माझ्या मित्रांसाठी सादर करत आहे
आज माझ्या जिवनात
झाली सोनेरी पहाट
दु:ख गेले सुख आले
आली खुशीची हि लाट II धृ II
उपाशी काढले दिन
पाण्याने भरले पोट
पोटासाठी दोन घास
तुडवली सदा वाट II 1 II
देव नाही दगडात
देव नाही आकाशात
कुडण्यात काय अर्थ
संकटास दोन हात II 2 II
कोणी भरवला घास
कोणी धोका कोणी लुट
केले कष्ट थोडी जिद्द
झटलो रात्र पहाट II 3 II
संघर्षाची आली लाट
काटे टोचले फुलात
बुद्धीला जोडी शिक्षण
रोज पक्वनाचे ताट II 4 II
सोमनाथ आ. पगार
नाशिक
मो. ९२७३३५७१५९
Email- somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog. www.somnathpagar.blogspot.com
Email- somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog. www.somnathpagar.blogspot.com