google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 27 फेब्रु, 2019

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

अष्टाक्षरी:- आई आमची मराठी

मराठी मातृभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐🙏🏻💐
*खालील लिंक ओपन करून युट्युब चॅनेल सब्सस्क्राईब केल्यावर नोटीफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका*💐🙏🏻🤝🏻
Https://youtube.com/user/SomnathPagar 

अष्टाक्षरी :- आमची माय मराठी

आई आमची मराठी
हिंदी आमची मावशी
इंग्रजीचे बोट हाती
सुर जुळले जगाशी ll१ll

मराठी निधडी छाती
इंग्रजी गव्हाळ कांती
हिंदी सिंधुतील मोती
जुळली जन्माची माती II२II

बोलतो मराठी बोली
जिला समुद्राची खोली
सूर्य जोडी हात दोन्ही
गाली पश्चिमेच्या लाली ll३ll

फडके क्षितिजावरी
झेंडा माझ्या मराठीचा
साता समुद्रापारही
ताज शोभे संस्काराचा ll४ll

निर्धार पक्का मनाशी
मराठीच्या जतनाचा
अभिमान ह्या उराशी
मराठीच्या वतनाचा ll५ll

प्रेमळ, मधाळ अशी
होठावं मराठी भाषा
बोट धरुनी वाढलो
विश्व शांतीचीच आशा ll६ll

ज्ञानदेव, तुकाराम
परंपरेचा आदर
सोमनाथा मुखी गोड
मराठीचाच जागर ll७ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏