google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 23 नोव्हें, 2020

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

गीत:- कथा कोरोना महामारीची

प्रेरणा:- शाहीर खंदारे काका, सलाबतपूर

कृपया,

https://youtube.om/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*


प्रथम नमन करू गणराया

रंगदेवता मनोभावे वंदितो

हात जोडुनी रसिक मायबापा

मनोरंजना शब्द, फुल अर्पितो

कोरोनानं दुरावली नाती, गोती

सुख, शांती, आरोग्य तुम्हा चिंतितो/ इच्छितो

कथा कोरोना महारोगाची ऐका

व्यथा महामारीची खरी मांडतो Ilध्रुII


महाराष्ट्रात प्रगतशील गाव

सुखसागर असे हो ज्याचे नाव 

कोरोना विषाणू हा कर्दनकाळ

उपाय सुचेना काय हो करावं

माणूस माणसाला झाला परका

जीव वाचवया सुरू धावाधाव

कोव्हिडनं घातलाच धुमाकूळ

चायना मेडचा हा कुटील डाव

राजा, रंक आणि राव आज पहा

जो-तो जिवाच्या आकांताने धावतो/ गागतो ll१ll


पोटापाण्यासाठी सारे दूरदेशी

लॉकडाऊननं गरीब उपाशी 

इमान, रेल्वे, एसटी, रिक्षा गाडी

स्तब्ध, निशब्द आहे त्या ठिकाणाशी

माय-बाप गावाला खेळ जीवाशी

माय हरली हो कोरोना रोगाशी

लेक शहरात गावाहून दूर

माय लेकविन गेली स्मशानाशी /जीवानिशी

फुकं धन, दौलत, पैसा अडका

माणूस जपा हात जोडुनी सांगतो II२II


*सोमनाथ पगार*, नाशिक

गीतकार/कवी, लेखक (MSRA, MABMCM) Mb.9273357159

Email-somnathapagar@gmail.com  

somnathpagar@yahoo.co.in

Blog: https://somnathpagar.blogspot.com

Follow me on my Blog, Facebook, Whatsapp, YouTube, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद


💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐


©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏