google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: कविता -दु:ख गेले सुख आले

शुक्रवार, १ एप्रिल, २०११

कविता -दु:ख गेले सुख आले

आजच्या दै . महाराष्ट्र टाइम्समध्ये  काल रविवार दि . २ सप्टे . २०१२ रोजी सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात नाशिकच्या काव्य मंचच्या ९ व्या वर्धापन दिनी संपन्न झालेल्या काव्यवाचन  कार्यक्रमाच्या  बातमीत  माझ्या   ' आज जीवनात आली सुखाची पहाट '  या कवितेचा उल्लेख आला आहे।
सदर कविता माझ्या मित्रांसाठी सादर करत आहे

आज माझ्या जिवनात
झाली सोनेरी पहाट
दु:ख  गेले सुख आले
आली खुशीची हि लाट II धृ II

उपाशी काढले दिन 
पाण्याने भरले पोट 
पोटासाठी दोन घास 
तुडवली सदा वाट II 1 II 

देव  नाही दगडात
देव नाही आकाशात
कुडण्यात काय अर्थ  
संकटास दोन हात  II 2 II

कोणी भरवला घास 
कोणी धोका कोणी लुट
केले कष्ट थोडी जिद्द
झटलो रात्र पहाट II 3 II

संघर्षाची आली लाट 
काटे टोचले फुलात 
बुद्धीला जोडी  शिक्षण 
रोज पक्वनाचे ताट II 4 II    

सोमनाथ आ. पगार 
नाशिक
मो. ९२७३३५७१५९
Email- somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in

Blog. www.somnathpagar.blogspot.com
 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: