google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 11/01/2017 - 12/01/2017

रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

गीत: जीवन नसे, पालापाचोळा

गीत: जीवन नसे, पालापाचोळा

समजून घे, भल्या मानसा
तवं श्वासाचा, अर्थ वेगळा
जीवन नसे, पालापाचोळा
हा तर जगण्याचा, सोहळा !!धृ!!

कार्य संपता, सुकती पाने
देठही गळती, आनंदाने
क्षणात येणे, क्षणात जाणे
नदी वाहे, कुठल्या कारणे
असंख्य तरु, भिडे अभाळा
परी श्रेय ते, मिळे नारळा !!2!!
जीवन नसे,,,,

सारे प्रवाशी, एका नावेत
कोणी भिकारी, कोणी राजे
मी तू पणाचे, नुसते ओझे
तुझे न काही, काही न माझे
ग्रह तारे, कुणासाठी सारे
उगा शोधिशी, जगी सावळा !!2!!
जीवन नसे,,,

सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स एसोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏