google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 2018

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

वाढदिवस आभार

नमस्कार, 
माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वांनी मला आपले शुभाशिर्वाद व शुभेच्छा देऊन उपकृत केले, त्यामुळे जगण्याला बळ व एक नवी दिशा मिळाली. भविष्यात वाटचाल करण्यास मला आपली सदिच्छा निश्चितच प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही. सर्वांचे मनपूर्वक आभार 💐🙏🏻

उत्सवाच्या या शुभ समयी
आनंदाचे उधाण नयनी
शुभेच्छांच्या आज वर्षावात 
आनंद द्विगुणित जिवनी II1II

असे आपुले जन्माचे नाते
जसे झाड अन त्याचे पाते
तुम्हा विण हो मी न कोणीही
मन आभाराचे गीत गाते II2II

वाढदिवसाच्या निमित्ताने
उमगे नात्याचे धागे नवे
तुम्हासारखे आप्त, सोयरे
आणि जगण्यास काय हवे II3II

आभाराचे शब्दही अपुरे
कर हे जुळती आपोआप
पुर्व संचिताचे पुण्य असे
मोजण्यास अपुरे सारे माप II4II

मी तुमचा तुम्ही सारे माझे
आयुष्यभर सोबत प्यारे
शुभेच्छा, अशीर्वाद सर्वांचे
धन्यवादाचे शब्द अपुरे II5II

🙏🏻💐💐💐💐

माझा आजचा वाढदिवस 
तुमच्यामुळे संस्मरणीय आहे
शुभेच्छांची हि सुमने
माझ्यासाठी अवर्णनीय आहे

तुम्ही सारे सोबत आहात
हीच माझी कमाई आहे
सर्वांचे मनपूर्वक आभार

आपलाच 💐💐💐💐💐💐💐💐💐
*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

*Youtube Channel*:- कृपया, पहा, लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करा, आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा🙏🏻
https://www.youtube.com/user/SomnathPagar

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

शिल्पी अवस्थी मॅडम यांचा वाढदिवस

मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2017 च्या महाराष्ट्र फर्स्ट रनर अप तथा युवा अवेकनिंग फाउंडेशन, नाशिकच्या अध्यक्षा शिल्पी अवस्थी मॅडम यांचा वाढदिवस ओम त्र्यंबकराज अनाथ बालगृह, मु. तुपादेवी, पो. अंजनेरी, त्र्यंबकेश्वर , नाशिक येथे अनाथ बालकांना अन्न दान व त्यांना प्रेरणा देऊन साजरा करण्यात आला. बालगृहातील विद्यार्थांनी कविता, गाणी आदी कलागुण सादर केले. यावेळी विद्यार्थांना  मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली.  याप्रसंगी नंदन खरे, देवेन कापडणीस, किशोर ठाकूर, अतुल सोनार, सविता खंदारे, बाळग्रहाचे संचालिका सौ अशादेवी अहिरराव, संचालक परमदेव अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगीचे काही क्षणचित्रे


शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

गीत:- कर्मधुरंधर आमचे भाऊ

आपले सर्वांचे प्रेरणास्थान, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. बाळासाहेब वाघ अर्थात आपले लाडके भाऊ यांचा आज वाढदिवस.
आदरणीय भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🎂
भाऊंना उदंड आरोग्यदायी सुख, समृद्ध आऊष्य लाभो, त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन व शुभशिर्वाद सदैव्य आपल्या पाठीशी राहो, यासाठी आई भवानी चरणी  प्रार्थना.
भाऊंच्या वाढदिवसानिमित्त माझी ही शब्द सुमने तिर्थस्वरूप भाऊंच्या  चरणी सविनय सादर,🙏🏻,,,,,,,

गीत:- *कर्मधुरंधर आमचे भाऊ*

कर्मवीर पुत्र शिक्षण तज्ञ
ध्यानी मनी हो शिक्षणाचा यज्ञ 
कर्मधुरंधर आमचे भाऊ
प्रेरणास्थान मुखी गुण गाऊ llध्रुll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
 
सहकारातून समृद्धीकडे
विकासाची फुलवली हि मळे
साक्ष देई कर्मवीर बंधारे
विकासाचे दिसे रूप वेगळे
भाग्यविधाता पाईक हो होऊ ll१ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ

समाज सेवेचा खरा आरसा
कर्मवीरांचा ते थोर वारसा
ज्ञानमंदिर उभारीले पहा
शिक्षणाचा हाती घेऊनी वसा
आधारवड हा आधार घेऊ ll२ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ

साधी राहणी नि उच्च विचार
घावला नीती मूल्यांचा भांडार
ज्ञानवंत, गुणवंत उदार
पाठीवर हात आम्हा आधार
थोर कार्याचा वसा पुढे नेऊ ll३ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

गजल:- रावणाला आता जाळायचे कशाला

*सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!*💐👏🏻

*सण दसरा आनंदाचा
शुभ कार्य नि मूहर्ताचा
सोने सुखाचे लुटण्याचा
सुख जनास वाटण्याचा* 

दसऱ्या निमित्त आपल्या सेवेत गजल पेश करतोय

गजल:- *रावणाला आता जाळायचे कशाला*
रावणाला आता जाळायचे कशाला
आरशाला सांगा भाळायचे कशाला ll१ll

देवळाला पैका माणूस हा भुकेला
राबणाऱ्या हाता पोळायचे कशाला ll२ll

धर्म जाती भेदाचा भार नकोसा
माणसाला सच्या चाळायचे कशाला ll३ll

प्रगतीचा झेंडा उंचावरी असेहा
तंत्रज्ञाना मोठ्या टाळायचे कशाला ll४ll

पोटपाणी फासा झाला जरी जगाया
दोरखंडा आता वाळायचे कशाला ll५ll

श्वास जाता मित्रा आवाज बंद होई 
वाळलेले पुष्पे माळायचे कशाला ll६ll

मान देऊ सर्वा कोणास राग नको
भारलेले नाते साळायचे कशाला ll७ll

सोमनाथा आता जागा तरी जगाला
पेटवूनी माथा जाळायचे कशाला ll८ll

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

सह्याद्री फार्म एक आनंद दायी अनुभव

 *सहयाद्री फार्म एक आनंददायी  अनुभव*
मोहाडी येथील सह्याद्री फार्मला गणेश उत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त जाण्याचा योग आला. यापूर्वी सहयाद्री फार्म व संचालक श्री. विलास शिंदे उर्फ आण्णा यांचे बाबत फक्त ऐकून होतो.
गेटच्या आत गाडी प्रवेश करतांना गेटवरील सिक्युरिटी गार्डने अतिशय आदराने आत जाण्यास इशारा केला. आत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष प्लांट पाहिला. सगळीकडे स्वच्छता, टापटीपपणा ठळकपणे जाणवला. सगळा परिसर मोठया उत्साहाने डोळ्यात साठविला. आज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्लांट बघण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी खास आमंत्रित केले होते. तेथील कर्मचारी वर्गाने अतिशय व्यवस्थित सर्व प्रक्रिया समजावून सांगितल्या. सर्व परिसर उत्साहाने  गजबजून गेला होता. छान पैकी पांढरा ड्रेस कोड, डोक्याला फेटा अशा थाटात कर्मचारी कर्मचारी आनंदात धावपळ करतांना दिसले.  प्रत्यक्ष प्लांट/ युनिट तसेच कार्यालय अतिशय कल्पकतेने आधुनिक यंत्रसामुग्रीयुक्त उभारले आहे. क्षणभर पाहणारा पाहतच राहतो. जाणीवपूर्वक लागवड केलेल्या शोभेच्या व इतर उपयुक्त झाडांनी परिसराची शोभा वाढवली आहे. काही दिवसात झाड मोठी झाल्यावर  परिसर अजूनही उठून दिसणार यात शंकाच नाही. सुंदर सुशोभीकरण डोळ्यात साठविले.
ग्रेप्स, फ्रुट, व्हेजिटेबल पॅकिंग हॉल, पलपिंग लाईन, फ्रोझन एफएफएफ पॅकिंग, मशिन एव्हपोरेटर, आय क्यु एफ फ्रिझिंग लाईन, रिफर लोडिंग डॉक्स, केच अप लाईन अँड ज्यूस ब्लेडिंग सेक्शन, जॅम असेपटीक कप फिलिंग लाईन असा हा संपूर्ण प्लांट पाहून झाला.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. संचालक विलास शिंदे आण्णा, सौ. शिंदे मॅडम, आदरणीय आई तथा इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचे पाल्य, व कर्मचाऱ्यांचा विविध क्षेत्र व परीक्षांमध्ये यश संपादन केले म्हणून सत्कार करून सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. एवढंच नाही तर फार्मच्या कार्यालयात अकौंटला कार्यरत कर्मचारी एमकॉम झाला म्हणून सत्कार तसेच हायजीन विभागाचे  सफाई कर्मचारी परिसर स्वच्छ ठेवतात, अगदी मन लावून सेवा बजावतात म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला. हे सर्व पाहून मन भारावून गेलं. हा सत्कार सुरु असतांना प्राचार्य वानखेडे सर उपस्थित कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना आपल्या पालकांबाबत अमूल्य मार्गदर्शन करतांना सतत विदयार्थ्यांना उपदेश करू नये. नेहमी तुलना करू नये. पाल्याला एखाद्या वेळी अपयश मिळाले तरी टोकाचा निष्कर्ष काढून भावनांचा उद्रेक करू नये. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून आश्वासक पालक बनणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले. आपल्या मुलांना पालकांनी गुणवत्ता पूर्ण अनुभूती द्यावी. त्यासाठी सहलीला सहपरिवार जावं. वेगवेगळी स्थळ, प्रदर्शनांना भेटी द्याव्यात. त्यातून पाल्यांना जबाबदारीची जाणीव होईल. असे प्रतिपादन पुढे बोलतांना त्यांनी केले.
मुळातच *सहयाद्री - सभारंभाची शान* हे ब्रीद वाक्य घेऊन *गणेश उत्सव* दरवर्षी आयोजित केला जातो. यातुन कर्मचारी, अधिकारी व त्यांचे पाल्य यांना विविध कलागुण जोपासता येतात. व सादर करण्याची संधी मिळते. मुळात *सहयाद्री फार्म- सीडींग हॅपिनेस* हे  कंपनीच स्लोगन  कायमच मनात घर करून जातं.   स्लोगन नुसार सर्व कर्मचारी, अधिकारी, पाल्य व शेतकरी आनंदी राहावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचा विलास शिंदे अण्णांनी या उत्सवा मागचा हेतू असल्याचा सांगितले. ऑफ द फार्मर्स, बाय द फार्मर्स, फॉर द फार्मर्स हि संकल्पना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
कर्मच्याऱ्यांचे पाल्य व कर्मचाऱ्यांनी नृत्य, गायन, नाट्य या विविध कला सादर केल्या. 
संचालक विलास शिंदे यांचेशी चर्चा करतांना त्यांची बुद्धिमत्ता, शिस्तप्रिय, अभ्यासू मात्र मनमिळाऊ स्वभाव भाव खाऊन गेला. सहपरिवार मोठया उत्सवात सर्वांच्या आनंदात सहभागी होऊनही मालक/ संचालक  असल्याचा कुठलाही अविर्भाव त्यांच्या वागण्यात जाणवला नाही. कदाचित या त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वभावामुळेच सहयाद्री फार्मच्या प्रगतीची पताका देशविदेशात मोठया दिमाखात फडकत आहे. सह्याद्री फार्मस हि ऍग्रीकल्चर क्षेत्रातील लिडिंग इंडियन फार्मर्स प्रोड्युसर अशी अग्रेसर कंपनी असून गुणवत्ता पूर्ण फ्रेश फ्रुट्स, फ्रेश वेजिटेबल्स, प्रोसेस्ड फूड्स यासाठी कम्पणीचा सतत नाव लौकिक झळकत राहो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

गीत:- लबाड पोरगं, स्टाईल करतं

लबाड पोरगं, स्टाईल करतं
पोरीला पाहून, स्माईल करतं llध्रुll
लबाड पोरगं.....

या केसांची हिप्पी, नाहीतर चप्पी
व्हाट्सअप, फेसबुकवर हॅपी
कधी हि स्पाईक, नवीन बाईक
ऑनलाइन न्यू, सरचिंग साईट
कमेंट देऊन, लाईक करतं ll१ll
लबाड पोरगं.....

 कॉलेजला दांडी, कॅंटीनला मांडी
मम्मी णि डॅड्डीला लावतय शेंडी
कडीमोडी जरी, दिसतेय बॉडी
सिग्नल हो तोडी, वर कुरघोडी
गॅंग बनवून, फाईट करतं ll२ll
लबाड पोरगं.......

समजतो हिरो, अभ्यासात झिरो
शायनिंग मारी, बनून हिरो
गर्ल फ्रेंड, बॉय फ्रेंड, हे नॉर्मल
रिलेशन शिप, झालीय फॉर्मल
चांगल्या डोळ्यांव, गॉगल लावतं ll३ll
लबाड पोरगं.......

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

गीत: माणुसकीचे आम्ही पुजारी, माणसाला सांधू

गीत:- *माणुसकीचे आम्ही पुजारी, माणसाला सांधू*

माणुसकीचे आम्ही पुजारी, माणसाला सांधू
माणसात या देव वसे हो, आनंदाने नांदू llध्रुll
माणुसकीचे........

एक सागर एक झरा हा, भागविण्या तृष्णा
एकच वारा पाऊस धारा, भरविण्या पान्हा
एकात्मतेची आज आमच्या, शिळ घुमे काना
जात, पात णि धर्म इथले, वळचणी बांधू ll१ll
माणुसकीचे........

लाल रक्त हे एक सगळे, भूमातेचे पुत्र
काळा वा गोरा भेद नसे हे, पुज्यनिय सूत्र
जोपासण्या हो समभाव हा, वापरूया नत्र
मानवतेच्या शत्रूचा आम्ही, निषेध हो नोंदू ll२ll
माणुसकीचे.......

विज्ञान आम्हा प्रगतीसाठी, बनवूया शिडी
आधुनिक या युगामधली, आमची हि पिढी
विकासासाठी झेप आमची, उंच मारू उडी
मनामनाची गुंफून नाती, थोरांना हो वंदू ll३ll
माणुसकीचे......

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

आले गणपती बाप्पा आले-You Tube Song

गणेश उत्सवा निमित्त बाप्पाच्या भक्तांसाठी खास गीत- *आले गणपती बाप्पा आले*.
*गीतकार सोमनाथ पगार* 9273357159
संगीतकार प्रफुल्ल तेजाळे/ राहुल रोकडे
गायक दिपक लोखंडे
Please watch, comment, share & subscribe 🙏🏻
 https://youtu.be/XWnmsepX5Hw


सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

लावणी:- * तुमच्या उसाच्या गोडीनं शहारले*


बावरले अन थोडीसी सावरले
राया, तुम्ही मला जेव्हा असे हेरले
समजत होते तुम्हा कडू कारले
तुमच्या उसाच्या गोडीनं शहारले llध्रुll
तुमच्या उसाच्या गोडीनं.....


कसदार तुमची बागायती शेती
ऐकून होते तुमची लई मी ख्याती
नाव तुमचं माझ्या काळजावरती
ऊस हा वाढलाय जोमानं वरती
तण पाहून मनी मी घाबरले ll१ll
तुमच्या उसाच्या गोडीनं......

चला एक उसाचं गुऱ्हाळ हो काढू
काकवी दोन्ही हातांनी तुम्हाला वाढू
जोरदार वाढला या उसाला तोडू
भाऱ्यावर भारे कारखान्यात धाडू
उसाच्या शेतात स्वप्नात सावरले ll२ll
तुमच्या उसाच्या गोडीनं......

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक 📱💻📝🎸📻🎧🎼👆



सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

आले गणपती बाप्पा आले- व्हिजन न्यूज गणेश उत्सवानिमित्त कविसमेलन



नमस्कार मित्रहो, गणेश उत्सवा निमित्त व्हिजन न्यूज, नाशिक या चॅनेलसाठी *आले गणपती बाप्पा आले* या काव्यमैफिलीत कविता सादर करण्याची सुवर्ण संधी मिळाली. मी (गीतकार सोमनाथ पगार), कवी जनार्दन देवरे, कवयित्री सविता दरेकर, कवी रावसाहेब जाधव आदी कवींनी सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे आपल्या रचना सादर केल्या. उत्तरोत्तर कवी कविसंमेलन रंगत गेले.
सदर कार्यक्रम दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 3.15 वा व रात्री 11.30 वा डेन केबल नेटवर्क चॅनेल नंबर 819 वर प्रक्षेपित करण्यात येणार आहे. रसिक मायबाप सदर काव्यमैफिलीचा आस्वाद You tube चॅनेलवरही घेऊ शकता.
धन्यवाद टीम व्हिजन न्युज- संचालक फईम शेख, मुख्य संपादक मित्र सतीश रुपवते,   निवेदिका नयना सनांसे प्रतिनिधी नजीम शेख, कॅमेरा मन  संदीप बनसोड, मार्केटिंग अंकित, सौरभ शिंदे

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

शिक्षकी माझा पवित्र पेशा

पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या चपराक या मासिकाच्य सप्टेंबर 2018 या अंकात *शिक्षकी माझा पवित्र पेशा* हे गीत प्रकाशित झाले आहे, धन्यवाद टीम चपराक (संपादक घनश्याम पाटील)
Add caption


रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

षडाक्षरी कविता: मैत्रीचा हा धागा

*षडाक्षरी कवितेचे नाव: मैत्री हा धागा* 

कृष्णा नि सुदामा
मैत्रीचा हा धागा
चवदार पोहे
विश्वासाची जागा ll1ll

सुखासाठी ज्याच्या
मैत्रीचा हा ससा
मित्रासाठी झेप
होई वेडा पिसा ll2ll

सुख असो दुःख
साथ असे पक्की
संकटावरही
मात असे नक्की ll3ll

कधीतरी जातो
विश्वासाला तडा
सोबत असे तो
मैत्रीचाच सडा ll4ll

विश्वासू असतो
मित्र जिवलग
वेळेवर करी
तोच लगबग ll5ll

मैत्रीचे बंधन
सुगंधी चंदन
मित्रांमुळे होई
आनंदी जीवन ll6ll

मैत्री नाव जरी
दोनच अक्षर
धरती अभाळा
क्षितिज आधार ll7ll

जीवन हे यज्ञ
मैत्री ही समिधा
मैत्रीचा असा धागा
कृष्णाची ही राधा ll8ll

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

मंगळवार, १० जुलै, २०१८

अष्टाक्षरी कविता: माय बाप

*अष्टाक्षरी कविता: माय बाप*

बाप आभाळाची छाया
माय धरतीची माया
पिलांसाठी माय बाप 
जसा जीवनाचा पाया ll1ll

बाप मैलाचा दगड
ताठ मणक्याचा कणा
माय भरविते आम्हा
रोज अमृताचा पान्हा ll2ll

आम्हा पाहून दुःखात
बाप होई कासावीस
हात मायेचा हळवा
माय वाटे मोरपीस ll3ll

बाप वडावानी पाठी
त्याची खोल पाळं मुळं
माय सुगंधी चंदन
झिजतिया तीळ तीळ ll4ll

आयुष्याचं  खरं सोनं
घ्यावं समजून जरा
माय बापाच्या मनाला
नको कधी थोडा चरा ll5ll

गेले सांगुनिया संत
जगी थोर माय बाप
उगा जावं का मंदिरी
जन्मदाते देवरूप ll6ll

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

शनिवार, १९ मे, २०१८

*प्रधानमंत्री या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ*

*प्रधानमंत्री  या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ* 

नाशिक - निगळ फिल्म प्रस्तुत प्रधानमंत्री या मराठी चित्रपटाचा शुभारंभ विणेकरी ह. भ.प.त्र्यंबक निगळ महाराज व चंद्रभागा निगळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला. महिरावणीचे उपसरपंच रमेश खांडबहाले, वासाळीचे सरपंच खेटरे, दुडगावचे सरपंच राजाराम           बेजेकर, वासाळीचे उपसरपंच भालेराव, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते देविदास निगळ, अभिनेता, सहदिग्दर्शक प्रदीप नाना देवरे, लेखक रामनाथ माळोदे, गीतकार सोमनाथ पगार,  क्रियटीव्ह दिग्दर्शक विक्रम गायकवाड, अतिष निगळ, अभिनेता प्रा. नवनाथ पारखे, ज्यू. शाहरुख खान प्रशांत वाळदे यांच्या उपस्थितीत निगळ फार्म वासाळी येथे चित्रीकरणास शुभारंभ करण्यात आला.

फक्त सातवी पास या मराठी चित्रपट निर्मितीचा अनुभव देविदास निगळ यांच्याकडे असून प्रधानमंत्री हा चित्रपट निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास रमेश खांडबहाले यांनी व्यक्त केला.
नाविन्यपूर्ण व हृदयस्पर्शी विषय रोमँटिक, कॉमेडी, लव्ह, राजकारण ठासून भरलेल्या या चित्रपटाच्या कथेचा आत्मा असलेले सर्व गाणी श्रवणीय झाली असून तरुणांसह अबाल वृद्धांना आवडतील यामुळे प्रधानमंत्री हा चित्रपट निश्चितच सुपर हिट होणार असे मत गीतकार सोमनाथ पगार यांनी व्यक्त केले.

संवाद लेखक रामनाथ माळोदे यांनी चित्रपटाची कथेबद्दल माहिती दिली. 

सोमनाथ पगार व रामनाथ माळोदे यांच्या गीतांना निलेश गरुड यांनी संगीत दिले आहे. मुहूर्त पसंगी चित्रित झालेल्या गीताला सुप्रसिद्ध पार्श्वगायक विजय सरतापे व शंकुतला जाधव यांनी स्वरसाज चढविला आहे.

कॅमेरामन त्रिलोक चौधरी, साउंड रेकॉर्डिस्ट यशवंत गुरव, रंगभूषा, वेशभूषा, हेअर ड्रेसर नूतन मिस्तरी, नृत्य दिग्दर्शन रिटा पंडित, लाईटमन आशुतोष लगट तर प्रोडक्शन टीममध्ये अभय चौघुले, संदीप जोगारे, अरुण ओहोळ, अभिजित कापडणीस यांचा समावेश आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत देविदास निगळ असून प्रिया फुलपगार, दर्पणा मिस्तरी, ज्यू.शाहरुख खान प्रशांत वाळदे, ज्यू. इम्रान हाश्मी सचिन ठाकरे, गणेश यादव, नाना देवरे, स्वप्नील रासेकर, विजय कदम, प्रेमा किरण, किशोर चौगुले, राजेंद्र जाधव, तुषार शहा, गौरी पाटील, माही वाघ, जागृती तसेच नाशिकचे इतर कलाकार भूमिका साकार करत आहेत.

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

आम्हावर उपकार

भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.भीमराव रामजी आम्बेडकर यांच्या 127 व्या जयंती निमीत्त त्याना कोटि कोटि त्रिवार वंदन आणि माझ्या सर्व मित्रांना माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐

कविता: आम्हावर उपकार

भारत देशाचे रत्न
तुमचे कार्य हो थोर
लिहली राज्य घटना
आम्हावर उपकार ll1ll

वंचितांना दिला न्याय
करून दूर अन्याय
भाग्य आमचे म्हणुनी
समतेचा हा अध्याय ll2ll

स्वप्न नव्या भारताचे
प्रगत नी विकासाचे 
एक होऊनिया सारे
लक्ष वेधण्या जगाचे ll3ll

आपले आकाश एक 
सूर्यही आपला एक
जोडुया मनाचे नाते
कर्म करूया हो नेक ll4ll

कागदावर समता
हवाल दिल जनता
जाती धर्माच्या नावाने
धोक्यात आली बंधुता ll5ll

नकोत इथले धर्म
नकोत आम्हा या जाती
पुन्हा नव्याने जुळावी
माणुसकीचीच नाती ll7ll

कृपा करा आम्हावर
दूर करा जातीभेद
गाडून टाका हे धर्म
धर्मांधतेला दया छेद ll7ll

आज बाबासाहेबांच्या
जयंतीच्या निमित्ताने
करू एकच निर्धार
नांदू गुण्या गोविंदाने ll8ll

सोमनाथ पगार (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏