राष्ट्रपती पारितोषिक मिळवणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलातपस्विनी आदरणीय मंगलाताई बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त माझी हि शब्द/भावसुमने.
आदरणीय ताईंना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐🎂🙏🏻
आई भवानी त्यांना उदंड, सुखी, समाधानी, धनारोग्य युक्त दिर्घ आयुष्य देवो. हिच सदिच्छा!
वाढदिवस गीत:- *जन्म दिनी खास आहे, मागणे हे ईश्वराशी*
लोककलेचा वसा पिढ्यांन पिढ्यांचा आम्हांसी
ताई कलाकारांसाठी जशी इतिहासी झाशी
जन्म दिनी खास आहे, मागणे हे ईश्वराशी
धन, आरोग्य, संपदा, तुम्ही व्हावे शतायुषी llध्रुll
जसा प्रकाश वातीला, महाराष्ट्राच्या मातीला
मंगलाताई तशा या, कलाकारांच्या पाठीला
धन्य कलांचा वारसा, आम्हा असे दिशादायी
रसिक मायबाप नि, रंगमचं गया, काशी ll१ll
यश किर्तीची पताका, कलाकुंभ तुम्हा ठायी
लोककलेचा बाग ही, बहरली तुम्हा पायी
तुम्ही ज्ञानी, तुम्ही गुणी, आणि कौतुकाच्या धनी
धडे तमाशा कलेचे, कलाकारा तुम्हा पाशी ll२l
जन्म दिन पुन्हा, पुन्हा, शतद: हा उगवावा
लोककलेचा हा ठेवा, मनोमनी साठवावा
उदंड आयुष्य लाभो, कला हेच धन गावे
सोमनाथ नत झाला, तुमच्या या चरणाशी ll३ll
*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Find me on my Blog, Facebook, Whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
*Youtube Channel*:- कृपया, पहा, लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करा, आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा🙏🏻
https://www.youtube.com/user/SomnathPagar