google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 11/01/2020 - 12/01/2020

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

गीत:- कथा कोरोना महामारीची

प्रेरणा:- शाहीर खंदारे काका, सलाबतपूर

कृपया,

https://youtube.om/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

प्रथम नमन करू गणराया

रंगदेवता मनोभावे वंदितो

हात जोडुनी रसिक मायबापा

मनोरंजना शब्द, फुल अर्पितो

कोरोनानं दुरावली नाती, गोती

सुख, शांती, आरोग्य तुम्हा चिंतितो/ इच्छितो

कथा कोरोना महारोगाची ऐका

व्यथा महामारीची खरी मांडतो Ilध्रुII

महाराष्ट्रात प्रगतशील गाव

सुखसागर असे हो ज्याचे नाव 

कोरोना विषाणू हा कर्दनकाळ

उपाय सुचेना काय हो करावं

माणूस माणसाला झाला परका

जीव वाचवया सुरू धावाधाव

कोव्हिडनं घातलाच धुमाकूळ

चायना मेडचा हा कुटील डाव

राजा, रंक आणि राव आज पहा

जो-तो जिवाच्या आकांताने धावतो/ गागतो ll१ll

पोटापाण्यासाठी सारे दूरदेशी

लॉकडाऊननं गरीब उपाशी 

इमान, रेल्वे, एसटी, रिक्षा गाडी

स्तब्ध, निशब्द आहे त्या ठिकाणाशी

माय-बाप गावाला खेळ जीवाशी

माय हरली हो कोरोना रोगाशी

लेक शहरात गावाहून दूर

माय लेकविन गेली स्मशानाशी /जीवानिशी

फुकं धन, दौलत, पैसा अडका

माणूस जपा हात जोडुनी सांगतो II२II

*सोमनाथ पगार*, नाशिक

गीतकार/कवी, लेखक (MSRA, MABMCM) Mb.9273357159

Email-somnathapagar@gmail.com  

somnathpagar@yahoo.co.in

Blog: https://somnathpagar.blogspot.com

Follow me on my Blog, Facebook, Whatsapp, YouTube, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद

💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

नांदी:-कोरोनाने साधला डाव

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

सांगतो ऐका रसिक मायबाप, 

विश्रामपूर नावाचं एक गाव

थंडी, ताप, शिंका, खोकल्यानं हैराण, 

तेथे कोरोनाने साधला हो डाव

चायना मेड विषानूचं थैमान, 

जिवाच्या आकांताने हो धावाधाव

नाती, गोती तोडली या कोरोनानं, 

रंजला, गाजला राजा, रंक, राव

जगावर राज्य करण्याची हाव, 

रोगराईचं पसरवलं भ्याव

दूरदेशी पोटासाठी व्हता लेक,

आईच्या वर्मी कोरोनाचा हो घाव

आई गेली बाप रडं एकटाच, 

पाणी द्याया नाही कुणी सुनं गाव 

किड्या, मुंग्यागत मरण का यावं, 

भयंकर रोगानं असं छळावं?

रंजला, गांजला राजा, रंक, राव,

कसा हा *कोरोणाने साधला डाव?*

*सोमनाथ पगार*, नाशिक

गीतकार/कवी, लेखक (MSRA, MABMCM) Mb.9273357159

Email-somnathapagar@gmail.com  

somnathpagar@yahoo.co.in

Blog: https://somnathpagar.blogspot.com

Follow me on my Blog, Facebook, Whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद

💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

गीत:-दीपावलीच्या मुहूर्तावर संकल्प करू

*सर्वांना दीपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏🏻🌷🌷*

हि दीपावली आपणास,आपल्या परिवारास *आनंदी, भरभराटीची, प्रगतीची, आरोग्यदायी* जावो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना

💐💐कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

दीपावलीच्या मुहूर्तावर संकल्प करू

कोरोनाच्या महामारीची हद्दपारी सुरू Ilध्रुII

आपले सणवार नि उत्सव चैतन्याचे 

जनामना दीप पेटवू हर्ष उल्हासचे

ज्ञानाच्या पणतीने विश्व आरोग्याला स्मरू ll१ll

आनंदाचे तोरण दारी अंधारावं मात

मानवतेच्या कल्याणास प्रकाशाची साथ

नव्या दमाने एकजुटीची रांगोळी भरू  II२II

बहीण, भावाच्या नात्यासम विश्व बंधुता

गुण्यागोविंदाने सारे नांदू उगा कटुता

पेरू स्नेह, माया नव्या युगाची नांदी ठरू ll३ll

प्रदूषणमुक्त धरा घेण्या मोकळा श्वास

नको फटाक्यांचा धूर हा वार राजरोस

भुकेल्याला घास भरवू हव्यासाला पुरु ll४ll

षढ, रिपू नष्ट करूया उद्याच्या कारणे

सर्वां समृद्धीचे वारे हेची एक मागणे

सुख, शांती, भरभराटीची कामना वरू ll५ll

आरोग्यमय दीपावली संसर्गाला टाळू

नको गळाभेट अंतर सुरक्षित पाळू

खाऊ करंजी, लाडू मास्क तोंडावर वापरू ll६ll