google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: संस्था गीत:- विकास शिक्षण मंडळ मंदिर संस्कारांचे

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

संस्था गीत:- विकास शिक्षण मंडळ मंदिर संस्कारांचे

कृपया, खालिल लिंक ओपन करून लाल अक्षरातील  *Subscribe* हे नाव प्रेस करून युट्युब चॅनल *Subscribed* केल्यावर नोटीफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐🙏🏻🤝🏻

Https://youtube.com/user/SomnathPagar

विकास शिक्षण मंडळ मंदिर संस्कारांचे
शिक्षणाच्या पंढरीत हे कार्य ज्ञानदानाचे Ilध्रुII

शिक्षण भूषण अण्णा विद्या भूषण शोभले
अक्का मायेची सावली शुभ आशिष लाभले
अभियान विकासाचे मानवाच्या कल्याणाचे ll१ll

गुणवंत, किर्तीवंत, सुज्ञ नागरिक घडे
यशो शिखरी हा झेंडा उंच आभाळाला भिडे
नित नवे धडे इथे विज्ञान तंत्रज्ञानाचे II२II

अण्णांचे स्वप्न आज हो अक्षराचे दान झाले
शिस्त, गुणवत्ता, दर्जा सारे नावा रूपा आले
मना मनात पेटले दिप ज्ञान साधनेचे ll३ll

समाज प्रगतीसाठी शिक्षण हे झाले श्वास
समानता, एकात्मता नीती, मूल्य झाले खास
छत्रपती हो आदर्श आगर कला गुणांचे ll४ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Youtube, Facebook, whatsapp, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२. स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४. मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: