कोरोना
नावाच्या व्हायरसने जगभर पसरायला सुरवात केली. आणि काही कालावधीतच भारतीय उपखंडात
सुद्धा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला. संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची
घोषणा केली. हातावर पोट असणारे गोरगरीब, मजुरांचा रोजगार थांबला.
त्यांची उपासमार होऊ नये म्हणून लोककल्याणकारी शासनाने रेशनमध्ये स्वस्त दरात रेशन
तसेच जनधन योजने अंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यावर प्रत्येकी पाचशे रुपये असे
तीन महिन्यात दरमहा जमा करणार असल्याची घोषणा केली.
बरं ही
बाब आजवर दुर्लक्षित होती मात्र अशा अडचणीच्या वेळी तरी लोकांनी ऑनलाईन सेवेचा
वापर केला पाहिजे. जेणेकरून संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल. यासाठी संबंधित बँकांचे
ऍप, गुगल
पे, पेटीएम, अमेझॉन
पे, फोन पे
असे विविध ऍप अतिशय उपयुक्त व सुरक्षित असल्याचे पटवून दिले पाहिजे. इतर वेळी
राजकारण असू शकतं मात्र आता आशा वेळी समाजपयोगी समाजकारण करायला पुढाकार घेणे आपले आद्य कर्तव्यच आहे.
आपल्या
आजूबाजूच्या अशा लोकांना सुरक्षिततेची काळजी घेऊन ऍप इंस्टोल करून देणे. बँक
अकाउंट, बेनीफिशअरी
ऍड करून देणे यासाठी ज्यांना माहीत आहे त्यांनी पुढाकार घेऊन लांबलचक रांगा
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे महत्वाचे काम करणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याच
खातेधारकांकडे एटीएम नसल्याने अडचण येऊ शकते, यावर खाते क्रमांक, शाखा, IFSC
कोड
टाकून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधीत बँकांनी उपाययोजना केली पाहिजे.
नुसताच
व्हाट्सप, फेसबुकवर
वेळ घालवण्यापेक्षा असं काही समाजासाठी योगदान देण्यासाठी तरुणांना तयार केले
पाहिजे.
तसेच
यापुढे जनधन खाते किंवा इतर कुठल्याही खात्यातून रक्कम काढण्यासाठी गर्दी होऊ नये.
ग्राहक खातेधारकांनी आपल्या खात्यातील रक्कम परस्पर खरेदीसाठी वापरावी, यासाठी
जास्तीत जास्त खातेधारकांनी ऑनलाईन सेवेचा वापर करण्याबाबतचे आवाहन तथा माहिती
दूरचित्रवाहिन्यावर दाखवण्यात यावी. तसेच वर्तमानपत्र आणि शासन स्तरावर नागरिकांचे
प्रबोधन करणे महत्वाचे ठरेल. असे मला वाटते.
सोमनाथ
आवडाजी पगार, नाशिक
गीतकार/कवी, लेखक (MSRA,
MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube,
Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल
भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन
राइटर्स असोसियशन
३.अखिल
भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी
साहित्य परिषद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा