google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अभंग:-गुरू जगी पूज्य

रविवार, ५ जुलै, २०२०

अभंग:-गुरू जगी पूज्य

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुःसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नम: ॥
  🙏🏻💐💐💐💐💐💐
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या सर्व आदरणीय गुरूंच्या चरणी माझें साष्टांग वंदन व ही भाव सुमने खास गुरूंसाठी 💐🙏🏻…!!
*गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!*

*गुरु जगी पूज्य*

https://youtube.com/user/SomnathPagar

गुरू जगी पूज्य l शिष्यासी सहज ll
ज्ञानाने हो सज्ज l करती ते  ll१ll

माय, बाप असे, पहिले हो गुरू ll
शिक्षक आधारु l दिशा दावी II२II

जणू ज्ञानदीप l जगा जसा सूर्य ll
वंदनीय कार्य l थोर करी  ll३ll

अज्ञानी ज्ञानाचा l दाखविती मार्ग ll
चरणाशी स्वर्ग l गुरूच्या हो ll४ll

गुरूंप्रति श्रद्धा l आदर, विश्वास ll
जीवनात खास l स्थान माझ्या ll५ll

सोमनाथ शिष्य l नमवितो माथा ll
गुरुचीही गाथा l गया, काशी ll६ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: