google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: संवाद काव्य:- आम्ही मुले रंगवितो स्वप्न उद्याचे जे हवे

शनिवार, ४ मार्च, २०२३

संवाद काव्य:- आम्ही मुले रंगवितो स्वप्न उद्याचे जे हवे

 विद्यार्थ्यांना विषय देऊन संवाद काव्य लिहण्याचा प्रश्न दिला जातो. 

अशाच 'आम्ही मुले चित्र काढतो' या विषयानुसार कागदावं कल्पनांच्या (किंवा कॅनव्हास कल्पनांचा) या संवाद- अष्टाक्षरी काव्याची रचना केली आहे.

सदर काव्य रचना आपल्याला आवडल्यास, नावासह फॉरवड करावी, ही विनंती💐🙏🏻💐

टीप:- सदर काव्य रचनेतील नावे काल्पनिक आहेत...

अथर्व: 

कल्पनांच्या कागदावं                               (कॅनव्हास कल्पनांचा)

रेखाटतो चित्र नवे

मुले आम्ही रंगवितो

स्वप्न उद्याचे जे हवे  ||१||

मधुरा:

गुरुजनांची प्रेरणा

हाती ज्ञानाचा कुंचला

सरस्वतीच्या साक्षीनं

श्रीगणेशा हा रंगला ||२||

अथर्व: 

अक्षरांच्या पर्वतावं

गाठू शिखरं यशाची

इंद्रधनूच्या कमानी

उजळणी पुनवेची ||३||

मधुरा:

अभ्यासाचे रंग भरू

निळे-जांभळे चित्रात

झेप घेऊ विश्वासाची

नव्या, अनोख्या क्षेत्रात ||४||

अथर्व, व मधुरा:

चित्र भासता वेगळे

नाचू लागे मनमोर

ज्ञान मंदिरी आगळे

चित्र रंगे घनघोर ||५|

सोमनाथ पगार, नाशिक

गीतकार/कवी, लेखक, युट्यूबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट. (MSRA, MABMCM) Mb.9273357159

Email-somnathpagar@yahoo.co.in

Follow/ Subscribe me on my Blog, Youtube Channel,  Facebook, Whatsapp, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud, Quora...

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद

कृपया,

https://youtube.com/c/SahityaTirth

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  Subscribe हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल Subscribed केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच  https://somnathpagar.blogspot.com

हा Blog Follow करून Subscribe  करण्यास विसरू नका. 💐🙏

तुमचे एक सब्सक्रिप्शन

हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन

Somnath Pagar Fan Club♻️

https://t.me/somnathpagarfanclub  हा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा 💐

 Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.💐

©®

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: