मित्रानो !!
मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेत अधिव्याख्याता, इंग्रजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट -अ (Lecturer in English, Polytechnic Teachers Services -GR -A ) या पदासाठी जुलै २०१४ मध्ये उत्तीर्ण झालो आहे.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे निवड यादी, शिफारस पत्र प्राप्त झाल्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडून कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून सद्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे.
माझ्या या यशात माझे गरीब, कष्टाळू व प्रामाणिक आई-वडिलांचे काबाड कष्ट, त्यांचे सत्कर्म, माझी भावंड, माझी पत्नी, माझी मुले, मित्र मंडळी यांची साथ, मला लाभलेल्या शिक्षकांची शिकवण, आप्तेष्टांचे शुभाशिर्वाद तसेच आयुष्याच्या महत्वाच्या टप्यावर मला भेटलेले क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माझे पितृतुल्य मा. देवधर सर, देवधर बाई, त्यांची मुले शिरीष दादा, कौस्तुभ भाऊ, मृणालिनी ताई यांचे योग्य वेळी मिळालेले योग्य मार्गदर्शन व आधार हा माझ्या आयुष्यात turning point ठरला. त्याचप्रमाणे डॉ. नांदुरकर सर, डॉ. कुशारे सर, प्रा. बंदी सर, प्रा. कडवे सर, प्रा. कोकाटे सर, डॉ. बर्वे सर, मुरारी सर, डॉ. कुटे सर, जाधव सर, कांडेकर सर, (अगणित नावे नमूद करण्यासारखी आहेत) या सर्वांनी वेळोवेळी केलेले सहकार्य, मार्गदर्शन आणि आदरणीय भाऊ, दादा यांची प्रेरणा व आदर्श यामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो . या सर्वांचे ऋण मी या जन्मात काहीही केले तरी फेडू शकणार नाही. आणि मी तसे करूही इच्छित नाही कारण मी सदैव्य या सर्वांच्या ऋणातच राहू इच्छीतो.
मला आजही आठवत, मी सर्वप्रथम "What are you searching for?" हे वाक्य मा. देवधर सरांशी बोलताना बरोबर बोलल्यावर सराना किती आनंद झाला होता. सर व बाई वेळोवेळी मला अभ्यासाठी मदत करायचे, मी लिहलेल्या कवितांबद्दल मार्गदर्शन करायचे . मा. देवधर सर व शिरीष दादांनी जर मला मदत केली नसती तर कदाचित माझ शिक्षणही अर्धवट राहिलं असत. मी जेव्हा MCVC परीक्षेत नाशिक बोर्डात बारावा तर पंचवटी महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो तेव्हा सर्वाधिक आनंद त्यांनाच झाला होता. खर म्हणजे जीवनात ध्येय काय असत? हे त्याच्यामुळेच मला समजले. (आजही माझ्या अशिक्षित आई-वडिलाना मी काय शिकलोय?, काय काम करतोय? हे सांगता येत नाही)
त्याचप्रमाणे मी एकदा "I am popular as …." असं एका अर्जात लिहलेले पाहून मा. डॉ. बर्वे सरांनी मला शब्दशा अर्थ समजावला व पत्र कसं लिहावं हे सांगितले. त्यांच्यामुळेच मला vocabulary, dictionary चे महत्व समजले.
मा. डॉ. नांदुरकर सरांनी माझ्याकडून एकदा मोठ्या विश्वासाने translation करण्याचे काम करून घेतल्याने मला माझी पात्रता सिद्ध करता आली, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढण्यास मदतच झाली.
डॉ. कुशारे सरांकडून तांत्रिक ज्ञानासह विभागात शिस्त बद्ध परंतु healthy वातावरण कसे असावे याच बरोबर उत्तम d rafting (notice , letter) शिकलो.
मा. प्रा. बंदी सरांकडून कार्यक्षमता कशी असावी, हे शिकायला मिळाले.
मा. प्रा. कडवे सरांमुळे उत्तम प्रशासक कसा असावा हे समजले. . .
अश्या रीतीने प्रत्येकाकडून मला काही ना काही शिकायला मिळाल्याने मी यशस्वी होऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे.
थोडक्यात माझ्या जडणघडणीत व वाटचालीत क. का. वाघ शिक्षण संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, मला लाभलेले सहकारी यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मी जो काही घडलो तो केवळ या सर्वांचे आदर्श, सहकार्य व मार्गदर्शनामुळेच यात तिळमात्र शंका नाही.
मागे वळून, आयुष्यात डोकावून पाहतांना,आत्मपरीक्षण केल्यावर जाणवते कि, माझ्या करिअरचा / आयुष्याचा प्रवास खरोखरच खडतर होता. तरी सुद्धा संकटाचा मुकाबला करत परिस्थितीशी दोन हात केले. वह्या पुस्तके एवढच काय साधी पेनची रिफील मिळण अवघड होत, ना अंगावर धड कपडे होते, दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती (साधारणता वीस - पंचवीस वर्षापुर्वीचा काळ) अशा परिस्थितीत उच्च शिक्षण घेण हे तर स्वप्नच होते. वेळेप्रसंगी मोलमजुरी, कामधदा करून इथवर पोहचलो . मी कोठून प्रवास सुरु केला व कुठवर पोहचलो हा विचार मनात आल्यावर जाणीव होते कि मी जर के. के. वाघला नसतो तर? आज कोठे असतो? ………………. हि कल्पनाही करवत नाही.
या संस्थेत माझा आजवरचा जवळपास २१ वर्षाचा प्रवास वेटर म्हणून सुरु झाला, त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिपाई, सद्या तंत्रानिकेतानला तांत्रिक सहाय्यक (विद्युत अभियांत्रिकी) आणि आता शासकीय तंत्रानिकेतानला इंग्रजीचा अधिव्याख्याता (Lecturer in English) होणार, असा आहे. मला मिळालेले सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन व मदत याबद्दल मी सर्वांचा शतशा आभारी आहे.
Somnath A. Pagar
Tech. Asst. Electrical Engg.
K.K.Wagh Polytechnic,Second Shift,
Amrut Dham, Panchvati, Nashik-3
Mb.9273357159
Blog :-www.somnathpagar.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा