google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अष्टाक्षरी:- असता गोठ्यात गाय

रविवार, ७ एप्रिल, २०१९

अष्टाक्षरी:- असता गोठ्यात गाय

*खालिल लिंक ओपन करून युट्युब चॅनेल सबस्क्राईब केल्यावर नोटीफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका*💐🙏🏻🤝🏻
Https://youtube.com/user/SomnathPagar

अष्टाक्षरी:-असता गोठ्यात गाय

घरात राबते माय
तशी गोठ्यात गाय
शेण, गोमूत्र पवित्र
जसे लक्ष्मीचे पाय ll१ll

जिच्या सडातून वाहे
जशा अमृताच्या धारा
मुलं, बाळ पुण्यवान
भारविती मुखी चारा II२II

वासराला चाटतांना
झरा मायेचा वाहतो
पाठीवर हात तुझ्या
स्वर्ग सुखाचा भासतो ll३ll

बांधा, मेराला स्पर्शती
लक्ष्मीची तुझी पावले
मन माझे आनंदाने
तुज मुळे भारावले ll४ll

हिरवाईत या गाई
जीवनाची हिरवाई
तेहतीस कोटी देव
तुझ्यात हि अपूर्वाई ll५ll

लळा मनाला लागला
माझ्या हाती हा कासरा
घर, अंगण शोभलं
तुझ्या मायेचा आसरा ll६ll

गाय, गाय माझ्या होठी
बिलगू मायच्या पोटी
माय, बाप जसे पाठी
सर यशाची हो छोटी ll७ll

धन्य खुटा, धन्य ओटा
जिच्या शेणाने हा झाला
समृद्ध संसार झुला
मुखी दुधाचा हा पेला ll८ll

असता गोठ्यात गाय
संसारात हवं काय?
घरवालीच्या पदरी
सौभाग्याचं वाय फाय ll९ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: