google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: गीत:- घावलंय सारं

रविवार, ७ एप्रिल, २०१९

गीत:- घावलंय सारं

कृपया, खालिल लिंक ओपन करून लाल अक्षरातील  *Subscribe* हे नाव प्रेस करून युट्युब चॅनल *Subscribed* केल्यावर नोटीफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐🙏🏻🤝🏻
Https://youtube.com/user/SomnathPagar

*गीत:-घावलंय सारं*

ती:-घावलंय मला सारं/ बाई
हरवलं सारं काही
तो:-समजलं कसं नाही
घडलंय काही बाही Ilध्रुII

तो:- मनाजोग झालं सारं
उधानल सारं वारं
ती:-काळजाच्या आरपार
तिर तरी वाटं गार
तो:-नाचतंय मन मोर
डोळ्याला या तार नाही ll१ll

ती:-आणि कसं अचानक
मन माझं धडाडलं
तो:-कडाडली वीज नाही
ढग जसं गडाडल
ती:-दुरावून क्षणभर
मन रमलय नाही II२II

तो:-काळजाला खोल ओल
काळजाचं बोलू बोल
ती:-तोळा, तोळा अनमोल
सांभाळूया आता तोल
तो:-आली कशी ऊब खोल
लोभ नाही धनाचाही ll३ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: