google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: *अष्टाक्षरी रचना:-पापडाचा आज बेत*

गुरुवार, २६ मार्च, २०२०

*अष्टाक्षरी रचना:-पापडाचा आज बेत*


कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

कोरोनाची आली साथ
राजा, रानी या घरात
पापडाचा आज बेत
पोर सोर उत्साहात ll१ll

डाळ आली किलो, किलो
मसाल्यात पीठ न्हाले
पाटा, वरवंटा आज
कधी नव्हे कामी आले II२II

पोळपाट, लाटणे हे
एकमेका साथ देई
तेल, पीठ सोबतीला
कसे एकजीव होई ll३ll

देतो फोडून मी लाट्या
तू ग! लाट गोल, गोल
खरे कसब बाईचे
जगी नाही ज्याचे मोल ll४ll

चवदार पापडाने
सान, थोर एक होई
कोरोनाच्या निमित्ताने
राजा, राणी गाणं गाई ll५ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: