*प्रतावना:-*
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा निमित्ताने आजकाल रोगप्रतिकारक शक्ती अर्थात immunity याबाबत दररोज वाचायला व ऐकायला मिळत आहे. कुठलाही प्रादुर्भाव अथवा रोगराई यांचा होणारा परिणाम हा ती व्यक्ती किती सशक्त अर्थात रोगप्रतिकारक आहे, यावर अवलंबून असते.
आरोग्यदायी, आनंदमय मजेत जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला कळत नकळत आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवावी लागते. परंतू हे आपण समजतो तेव्हढं सोपे काम मुळीच नाही. धक्काधक्कीच्या व्यस्त दिनक्रमात आपले स्वतःकडे दुर्लक्ष होते. आणि आपण अप्रत्यक्ष आजारपणाला निमंत्रण देतो. प्रथमतः रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? ते समजावून घेवूया.
*रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे कोणत्याही शारीरिक रोगास प्रतिकार किंवा रोग होऊ नये यासाठी उपयुक्त असा प्राण्यांच्या तथा व्यक्तीचा अंगभूत गुण होय.*
दोनवेळच्या अन्नपाण्याची भ्रांत मिटवण्यासाठी या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला कामधंदा करावाच लागतो. मग ती व्यक्ती कोणीही असो. नोकरदार, कारखानदार, कामगार, गृहिणी किंवा अगदी क्षुल्लक भिकारीही.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे व ती वाढवण्याचे उपाय याबाबतची मिमांसा खालीलप्रमाणे करता यईल.
*रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे,*
अनेकजण सतत आजारी पडतात. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, पडसे, खोकला, ताप या समस्यांमुळे नेहमीच बेजार असतात. याला कारण त्या व्यक्तीची कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती होय. याला कारण आहेत, बदलते जीवनमान, बदलते वातावरण, वाढते प्रदूषण व शहरीकरण, खाण्यापिण्याच्या बदलत्या व चुकीच्या सवयी.
१) *बदलते जीवनमान:-*
आजकाल लोकं रात्री जास्त वेळ जागरण करतात. काहींना बैठे काम असते. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. शिफ्ट अर्थात पाळीच्या (ड्युटी) कामाच्या वेळा असतात.
त्यामळे जेवण, नाष्ट्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. पूर्वी लोकं रात्री लवकर झोपायचे, सकाळी पहाटे उठायचे. सकाळच्या शुद्ध वातावरणात कामं, व्यायाम करायचे. आजच्या बदलत्या जीवनमानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
२) *वाढते प्रदूषण व औद्योगिकरण:-*
जीवनमान समृद्ध होण्यासाठी औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. रहिवाशी तसेच उद्योग धंद्यांसाठी वृक्षतोड झाली. कालांतराने परिचर संस्था बिघडली. जल, वायू, ध्वनी प्रदूषण वाढले. रोजच्या खाण्यातील अन्न पदार्थ, पाणी प्रदूषणामुळे दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे समुद्रातील जलचर धोक्यात येत असून तेच जलचर मनुष्य खात असल्याने रोगराई वाढते. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
३) *वाढते शहरीकरण:-*
औद्योगिकरणामुळे रोजगारा संधी वाढतात. लोकं शहरात येतात मात्र अर्थार्जनाच्या मागे लागून तथा मिळणाऱ्या कमी मोबदल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. व्यायाम नाही की चांगल्या दर्जाचे अन्न, पाणी नाही. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
४) *अमर्याद कीटकनाशकांचा वापर:-*
जास्त प्रमाणात शेतीतून उत्पादन मिळावे म्हणून अमर्याद कीटकनाशकांची फवारणी पिकांवर केली गेल्याने दैनंदिन आहारात खाल्ला जाणारा भाजीपाला, धान्यातील विषारी अवशेष शरीरात वाढत जाऊन रोगराई वाढवतात. असे अन्न पदार्थ आरोग्यवर वाईट व दूरगामी परिणाम करत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
५) *नशील्या पदार्थांचे सेवन*:-
चैन, हौस, ऐशो आराम, मजा, उत्सुकता यामुळे बऱ्याच व्यक्ती नशीले पदार्थ उदा. बिडी, सिगारेट, तंबाखू, दारू, चरस, गांज्या यांचे सेवन करतात. हे पदार्थ आरोग्यवर अत्यंत घातक परिणाम करतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
*रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे उपाय*
फक्त सकस आहार घेतला म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे मुळीच नसते. त्यासाठी खूप जाणीवपूर्वक वागावे लागते. आपल्याला रोगांना, आजारांना तोंड दयावे लागू नये, आपली तब्येत, आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी काळजी घ्यावी लागते. आरोग्यदायी शरीर असेल तरच जीवन सुखी, समाधानी व समृद्ध बनते. सुखी जीवनासाठी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरू शकतात.
१) *नियमित व्यायाम व काम:-*
सकस आहरासोबत नियमित शारीरिक कष्टांची तसेच व्यायामाची सुदृढ शरीरासाठी नितांत आवश्यकता असते. आपण बऱ्याचदा कष्टाची मातीकाम करणारे मजूर आपल्यापेक्षा अधिक मजबूत असल्याचे अनुभवतो. व्यायामाने, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे व कष्टाच्या अंगमेहनतीच्या कामामुळे आपल्या शरीरातील स्नायू व हाडे मजबूत होतात. म्हणून नियमित व्यायामाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
२) *पौष्टिक आहार घेणे*
आजकालच्या फास्ट युगात ऑर्डर दिली का अली बाबाच्या गुहेसारखं हवं ते तात्काळ उपलब्ध होते. गुगल बाबा आपल्या सेवेसाठी सदैव्य हजर असतो. फास्टफूड, जंकफूड चुटकीसरशी समोर खायला, जिभेचे चोचले पुरवायला हजर. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. फास्टफूड, जंकफूड रोगवर्धक असतात. त्याऐवजी घरातील ताजे स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन केलेले केव्हाही उत्तम. शिवाय कार्बोनेटेड शीतपेय आरोग्यासाठी अपायकारक असून त्याऐवजी आरोग्यदायी लिंबू सरबत, उसाचा रस, फळांचा रस यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
३) *आनंदी राहणे:-*
राग, द्वेश, मत्सर, काळजी, चिंता हे चांगल्या आरोग्याचे शत्रू असल्याने आनंदी, हसत खेळत, तणावमुक्त वातावरणात खाणे, पिणे, राहणे केव्हाही चांगले. चांगली पुस्तके वाचावी, चुटकुले, ऐकावे, वाचावे. परिणामी शरीरातील ग्रंथी योग्य रित्या स्रावल्याने आरोग्य चांगले राहते तथा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
४) *पौष्टिक नैसर्गिक ताजा व शुद्ध आहार विहार*
प्रदूषण मुक्त वातावरणात वावर असणे केव्हाही उत्तम. त्याचप्रमाणे रोजच्या आहारात कांदा, लसूण, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच दही, तूप, लोणी, ताक, ओट्स, लिंबू, आवळा, संत्री, सफरचंद इत्यादींचा समावेश केल्याने संक्रमित रोगांपासून बचाव होतो. चहा कमी प्यावा. तळलेले पदार्थ शरीरास घातकच. न उकडता शिजवलेले अन्न पदार्थ खाणे योग्य. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास निश्चितच मदत होते.
लवकर उठावे, लवकर झोपावे
करारी असावे उगा रोगट नसावे
ताजे शुद्ध खावे, प्यावे, शिळेही टाळावे
प्रकृती जपण्या, हसावे आणि खेळावे
केवळ काळजी करण्यापेक्षा उत्तम आहार, विहार, नियमित व्यायाम असे किरकोळ सहज साध्य नियम पाळले तर आपले आरोग्य चांगले राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपलं आपल्या अनमोल जीवनाचा आयुष्यभर मनमोकळा आनंद घेऊ शकतो. त्यामळे रोगप्रतिकारक शक्ती ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तर मग मंडळी उत्तम आरोग्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
*सोमनाथ आवडाजी पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा