*भावपूर्ण श्रद्धांजली*💐🙏🏻
पाचोरे वणी गावचे सुपुत्र लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय शिक्षक, आपल्या जबरदस्त वक्तृत्व शैलीने जनमाणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व, थोर समाजसेवक, ज्येष्ठ विचारवंत *कै. दौलतराव वाटपाडे गुरुजींचे* दुःखद निधन झाले आहे. वाटपाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समाजाची कधीही न भरून निघणारी अशी हानी झाली आहे. अशा या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सारे वाटपाडे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. जेव्हा, जेव्हा त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा योग आला तेव्हा, तेव्हा त्यांचेकडून कळत नकळतपणे फार काही शिकायला मिळाले आहे. खरं तर अशी शिकवणूक ही आयुष्याची शिदोरी असते. त्या शिदोरीच्या बळावर जीवनप्रवास सुरू असतो.
त्यांच्या अचानक जाण्याने आपण सारे पोरके झालो आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
त्यांच्या पवित्र स्मृतीस हे भावपुर्ण शब्द सुमने अर्पण. भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🏻
वटवृक्षाची सावली
आज जशी हरवली
आप्पा तुमच्या जाण्यानं
लक्ष नेत्र पानावली ll१ll
तुम्ही आम्हास दाविला
मार्ग सचोटीचा खरा
जनामनात वाहील
कीर्ती सुगंधाचा झरा ll२ll
तुम्ही आमचे सर्वस्व
आम्हा आनंदाचे पर्व
थोर वक्तृत्व शैलीचा
खरा, खुरा होता गर्व ll३ll
तुम्ही दावल्या मार्गावं
पुढे, पुढे जात राहू
येता आठव तुमचे
चंद्र, सूर्य, तारे पाहू ll४ll
आशीर्वाद शिरावरी
उरी असेल जाणीव
तुम्ही सोबत नसाल
हिच असेल उणीव ll५ll
एक आदर्श शिक्षक
महामेरू कर्तृत्वाचे
पिढी घडवली तुम्ही
श्रद्धास्थान विद्यार्थ्यांचे ll६ll
लाभो शांती तव आत्म्या
ईश्वराशी हे मागणं
तुम्ही यावं परतुनी
पुनर्जन्म हो घेऊन ll७ll
तव स्मृतीस वंदन
शब्द सुमन अर्पण
भावपूर्ण श्रद्धांजली
विनम्र अभिवादन ll८ll
सोमनाथ पगार, नाशिक
Mo.9273357159🙏🏻💐
1 टिप्पणी:
Very good Somnath Pagar Ji.
टिप्पणी पोस्ट करा