google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: बाल कविता:- मूल हसतं घर सजतं

मंगळवार, ३० मार्च, २०२१

बाल कविता:- मूल हसतं घर सजतं

*सन्मानीय साहित्यिक बाबा जाधव उर्फ मारुती जाधव सर*

आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻💐
सर, आपण संपादित केलेल्या तथा पद्मरत्न या प्रकाशन संस्थेद्वारा प्रकाशित केलेल्या *हरवलेले बालपण* या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात माझ्या *मूल हसतं घर सजतं* या कवितेचा समावेश करून मला आपण उपकृत केले याबद्दल मी आपला मनःपुर्वक आभारी आहे.
सदर काव्यसंग्रह नुकताच हातात पडला. आणि एक वाचनीय काव्यसंग्रह वाचावयास मिळाल्याचा आनंद झाला. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके व समर्पक झाले असून सर्वच कविता वाचनीय व आशयपूर्ण आहेत. त्यामुळे मी इथे कुणाचेही वयक्तिक नाव नमूद करत नाही.

सदर काव्यसंग्रह दुदुदुडू पावलं टाकता, टाकता अचानक सोडून गेलेलं तान्ह बाळ अथर्वच्या स्मृतीस समर्पित आहे.

या काव्यसंग्रहात एकूण उत्तोमोतम अशा ११५ कवितांचा समावेश असून लोकप्रिय ठरू पाहणारा, रसिक वाचकांकडे संग्रही असावा असा हा काव्यसंग्रह झाला असून खरं तर बऱ्याच काळानंतर असा आशयघन कवितासंग्रह हातात पडल्याने या संग्रहातील कविता वाचतांना मन रमून जाते व आपण वाचताच राहतो.
सर आपले पुनश्च आभार

आपला विश्वासू

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी, लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट... (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Follow/ Subscribe me on my Blog, Youtube Channel,  Facebook, Whatsapp, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: