google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: गीत: व्हटावर आलं या

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

गीत: व्हटावर आलं या

गीत: व्हटावर आलं या
तुह्या पेरमाच गाणं गाया
मन गिटार झालं या
लई दिसाचं मनात माह्या
व्हटावर आलं या llधृll
रूप हे भारी फुलावाणी
खुलून आलं या
येड्या मनाला येड लावी
सपन झालं या
तुह्या पेरमाच्या शाळामधी
पटावर आलं या ll1ll
लई दिसाचं मनात माह्या
व्हटावर आलं या
लई इखारी, तुही नजर
वार करती या
अंगात आलं, पेरमाचं वारं
नाच करतं या
छापून आलं, खरय सारं
नेटावरआलं या ll2ll
लई दिसाचं मनात माह्या
व्हटावर आलं या
तुह्या मनातलं, ओळखून सारं
धाडस आलं या
सांगाया सारं, खरं खुर
ठरून आलं या
वऱ्हाड पुरं, माहभी घोड
गेटावर आलं या ll3ll
लई दिसाचं मनात माह्या
व्हटावर आलं या
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MFRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: somnathpagar.blogspot.com
©® या रचनेचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी कृपया संपर्क करावा, हि नम्र विनंती 📱💻📝🎸📻🎧🎼👆👏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: