google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अभंग:- सुखी सासरी या

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अभंग:- सुखी सासरी या

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- सुखी सासरी या

सासूर वाशीन l नावाची मी खरी l
एकतात सारी l शब्द माझा llll

येईना आठव l माहेरचा मला l
आधार जीवाला l सासरचा llll

स्वप्नांचे हे पंख l विहरते मुक्त l
होते सदा व्यक्त l मनाने मी llll

स्रीचा जन्म माझा l आनंदी आयुष्य l
घराचे भविष्य l माझ्या हाती llll

चार भिंतीत मी l होते कधी तरी l
आज हाती दोरी l संसाराची llll

पती पत्नी दोघ l जणू छापा काटा l
उचलतो वाटा l सामान हो llll

माहेर सासर l मज हे समान l
दोन्ही कडे मान l मिळतो हो llll

जाता माहेरास l सासरची आस l
होई सदा भास l सासरी मी llll

घ्याया नको येऊ l मला भाऊ राया l
सुखी संसारी या l सदा मी रे! Llll

धुण्या-भांडया साठी l बाई कामवाली l
माझ्याच हवाली l घर माझे ll१०ll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: