google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अभंग:- वारी पंढरीची

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अभंग:- वारी पंढरीची

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏
अभंग:- वारी पंढरीची

निरंतर चालू l वारी पंढरीची ll
पिडा हो कुणाची l टळली का llll

करुनिया स्नान l चंद्रभागा मधी ll
जीवनाची चांदी l कुणाची हो llll

भरते तिजोरी l वर शिरजोरी ll
लागतेच बारी l दर्शनाशी llll

देवाचिया दारी l देता नोट साधी ll
दर्शनास संधी l मिळते हो llll

सारे तीर्थ क्षेत्र l कसे धनवान ll
गरीब हे जन l उपाशी का llll

पावेल का देव l कोणी जरा सांगा ll
वाहिल का गंगा l पुण्याईची llll

पाझर फुटावा l देवा आता तरी ll
मिटवावी दरी l लाचारी हि llll

गरीबांचे वाली l देव ना शासन ll
स्वप्न अच्छे दिन l कायमचे llll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: