google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अभंग:- बाप माझा राजा

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अभंग:- बाप माझा राजा

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- बाप माझा राजा

बाप माझा राजा l हुबेहूब आजा
होणे नाही दुजा l जगा मधी llll

दमुनिया रोज l बाप टाकी धाप
कष्ट वारे माप l रोज करी llll

निष्टुर हे जग l मिळे ना हो दाम
मातोमोल घाम l बापाचा हो llll

आम्हा मुलांसाठी l बाप हाच देव
आम्हा नाही भेव l कशाचेही llll

जगाचा पोशिंदा l औत घेई हाती
पिकवितो मोती l शेतामधी llll

जिवनाची शाळा l बाप सादा भोळा
रोजच सोहळा l बापामुळे llll

देशात या माझ्या l लोकशाही मोठी
उपाशी हि पाटी l आयुष्याची llll

सोमनाथ म्हणे l मी हो धनवान
बाप गुणवान l लाभला हो llll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar