google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अष्टाक्षरी कविता: माय बाप

मंगळवार, १० जुलै, २०१८

अष्टाक्षरी कविता: माय बाप

*अष्टाक्षरी कविता: माय बाप*

बाप आभाळाची छाया
माय धरतीची माया
पिलांसाठी माय बाप 
जसा जीवनाचा पाया ll1ll

बाप मैलाचा दगड
ताठ मणक्याचा कणा
माय भरविते आम्हा
रोज अमृताचा पान्हा ll2ll

आम्हा पाहून दुःखात
बाप होई कासावीस
हात मायेचा हळवा
माय वाटे मोरपीस ll3ll

बाप वडावानी पाठी
त्याची खोल पाळं मुळं
माय सुगंधी चंदन
झिजतिया तीळ तीळ ll4ll

आयुष्याचं  खरं सोनं
घ्यावं समजून जरा
माय बापाच्या मनाला
नको कधी थोडा चरा ll5ll

गेले सांगुनिया संत
जगी थोर माय बाप
उगा जावं का मंदिरी
जन्मदाते देवरूप ll6ll

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

जबरदस्त बाप