विठुरायाच्या वारी सोहळ्याला मानाच्या पालख्या मानाच्या वारकऱ्यांसह कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हेलीकॉप्टरने यावर्षी येणार, हे समजल्यावर मी अस्वस्थ झालो. हेलिकॉप्टरने येणारे हे सर्वसाधारण वारकरी नसणारच म्हणजेच देवाच्या द्वारीसुद्धा गरिबाला वाव नाही. भल्या पहाटेला याबाबतची पोस्ट वाचून मी अस्वस्थ झालो. आणि दि. 1 जून 2020 रोजी पहाटेला 5.45 वा. हा अभंग लिहून रिता झालो.
कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
इमानात येई l तुझी रे पालखी ll
आमच्या मूलखी l कोरोना रे! ll१ll
मान, पान देवा l नको गरिबाला ll
घाम नशिबाला l चिकटला II२II
नेम न टळावा l मोडशी होईल ll
पोटात येईल l देवा तुझ्या ll३ll
जाऊ देत जीव l महारोगापाई ll
पालखीचे भोई l दर्शनाला ll४ll
तुला सरकार l आम्ही सरदार ll
बडवतो उर ll दुःखा पाई ll५ll
किड्या, मुंग्यागत l झालं जरी जिणं ll
गाऱ्हाणं हे जुनं l तुझं द्वारी ll६ll
सोमनाथ आता l पुसतो हा बुक्का ll
देव मुका, मुका l असतो का? ll७ll
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
२ टिप्पण्या:
Excellent
Excellent Sirji
टिप्पणी पोस्ट करा