google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: गीत: आय लव्ह यु मनातलं, मला आहे बोलायचं

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

गीत: आय लव्ह यु मनातलं, मला आहे बोलायचं

गीत: आय लव्ह यु मनातलं, मला आहे बोलायचं

कृपया, https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला Subscribed, Like, Share, Comment करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका 💐🙏
मनात आलं कितीदा, सांगून टाकू एकदा
दिलाचा घेऊन ताबा, स्वप्नात आली कितीदा

आज गुपित प्रेमाचं, मला आहे खोलायचं
आय लव्ह यु मनातलं, मला आहे बोलायचं llध्रुll
आय लव्ह यु मनातलं,, मला आहे बोलायचं......
तोंडावर धरतो मी, अशी नुसतीच वही
पेनातली संपलेली, असते माझी ग! शाही
नुसताच राही जागा, मला काही करमना
झोप भी मज येईना, तू मनातून जाईना
या गुडघ्याला बाशिंग, तुला कधी कळायचं ll1ll
आय लव्ह यु मनातलं, मला आहे बोलायचं......

सिनेमाचं तिकीट मी, तुजसाठी घेईन
बाल्कनीत बसून, फक्त तुलाच पाहीन
अभ्यासाची वही माझी, रोज तुला ग! देईन
होमवर्क सारा तुझा, देवशपथ करीन
अग! थांबना, एकना, तुला आहे भेटायचं ll२ll
आय लव्ह यु मनातलं, मला आहे बोलायचं.......

शेवटच्या पानावर, वहीत तुझीच जागा
वहिनी तुला म्हणती मित्र अन मला दादा
इकडून तिकडं उगा, मारतोय चकरा
शोधत राही तुला मी, हा आवडतो नखरा
मला ग! लगीनघाई, तुला आहे सांगायचं ll३ll
आय लव्ह यु मनातलं, मला आहे बोलायचं......

सोमनाथ पगार (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: