google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: *गीत:-जशी वाघाची डरकाळी, वीर शिवबाची हो स्वारी*

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

*गीत:-जशी वाघाची डरकाळी, वीर शिवबाची हो स्वारी*


कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
 
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

जशी वाघाची डरकाळी
वीर शिवबाची हो स्वारी
गड किल्ले हे साक्ष देती
सह्याद्रीच्या कडेकपारी Ilध्रुII

अफजल फाडला ज्यानं
दुष्मनांचा कर्दनकाळ
जिजाऊ देई कानमंत्र
मावळ्यांना लढण्या बळ
होऊन जिवावं उद्धार
चालवल्या हो तलवारी ll१ll

महाराष्ट्राची माती सोनं
इथं शूर वीरांची खान
वार छातीवर झेलून
सजवली भूमी रक्तानं
स्वराज्याचं शोभे तोरण
हे रायगड, शिवनेरी II२II

वाघाच्या जबड्यात हात
उडे अंगाव थरकाप
खैबर खिडीतली झुंज
कार्य कर्तृत्वाची हो छाप
दगडाला पाझर फोडी
नजरा नजर करारी
ll३ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक 📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: