google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: *बालकविता:-खारूताई*

गुरुवार, २६ मार्च, २०२०

*बालकविता:-खारूताई*


कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

खारूताई, खारूताई
काय बाई तुला घाई
भुरभर, सरसर
वर जाई, खाली येई ll१ll

कुरतडत असते
सदानकदा काय तू
दात तुझे हाय फाय
कशी थकत नाय तू II२II

पिटुकली, चिंटूकली
लगबग लपण्याची
कला कशी ठाव तुला
अगो बाई वळण्याची ll३ll

मऊ, मऊ घरट्यात
पिल्लं तुझी खेळतात
दार लावलं का नाही
घोर नको काळजात ll४ll

अंगणात आराधरी
रोज येणा खेळायला
कॅडबरी, कुरकुरे
तुला देईल खायला ll५ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: