google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: पिढ्यान पिढ्या नावात उरत असतो बाप*

रविवार, २१ जून, २०२०

पिढ्यान पिढ्या नावात उरत असतो बाप*

पितृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏🏻
या निमित्ताने माझी एक रचना
कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

पिढ्यान पिढ्या नावात उरत असतो बाप
कुळाच्या भल्यासाठीच भरत असतो माप

जीवघेण्या खेळ सारा दिसत नसतो घाव
काळजात जखमांचा घोकत असतो गाव

हसत वादळात पिटाळत असतो नाव
घामाघूम होतो तरी काढत असतो धाव

मनगटात जरीही दिसत असलं बळ
कुणाला दिसत नाही थेट रक्तातील कळ

पिलांमुखी चाऱ्यासाठी  घोर पोसतो उरात
धाप टाकत असतो जो संकटांच्या पुरात 

स्मशानात जळणाराच नसतो बाप खरा
मुलांसाठी वाहत असतो झुरणारा झरा 

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: