गित- देवा तुझे आभार
देवा तुझे आभार, मानु मी किती?
दिले सार तू, माझी झोळी रे रीती !!ध्रु!!
दिले सार तू, माझी झोळी रे रीती !!ध्रु!!
दिले ज्ञान, मला अन दिली बुद्धी
केले कष्ट, देवा तू दिली कीर्ती
हाव संपेना, अपयशाची भीती!!1!!
देवा तुझे आभार....
केले कष्ट, देवा तू दिली कीर्ती
हाव संपेना, अपयशाची भीती!!1!!
देवा तुझे आभार....
माय बाप, पत्नी , मूल बाळ सुखी
सोस दुःख, दोन घास देसी मुखी
आभाळी झेप, पायाशी राही माती!!2!!
देवा तुझे आभार
सोस दुःख, दोन घास देसी मुखी
आभाळी झेप, पायाशी राही माती!!2!!
देवा तुझे आभार
देवू नशिबाला दोष कशापायी
सुख देसी , घेइ दुखाची कसोटी
तूच दावी मार्ग, श्रेय दूजे घेती!!3!!
देवा तुझे आभार
सुख देसी , घेइ दुखाची कसोटी
तूच दावी मार्ग, श्रेय दूजे घेती!!3!!
देवा तुझे आभार
निर्मिली तू हवा, पाणी सर्वांसाठी
धनधान्य संपती, समृद्धि शांती
जोड़ी हात सोमनाथ, दुःख जाती!!4!!
देवा तुझे आभार
धनधान्य संपती, समृद्धि शांती
जोड़ी हात सोमनाथ, दुःख जाती!!4!!
देवा तुझे आभार
सोमनाथ आ. पगार, गीतकार/कवी
mb 9273357159
ईमेल somnathapagar@gmail.com
mb 9273357159
ईमेल somnathapagar@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा