कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
येई धावून डॉक्टर
रुग्ण सेवेस तत्पर
देवदूत या भुवर
देई दिलासा सत्वर ll१ll
सेवा परमो धर्म: हा
रुग्णासाठी समर्पण
नाव जणांच्या ओठाशी
डॉक्टरांचं आदरानं II२II
रुग्णाप्रती सेवावृत्ती
कर्तव्याचे संस्मरण
दर्जेदार उपचार
विश्वासाचे आचरण ll३ll
काही क्षणांचं निदान
सोबतीला तंत्रज्ञान
धन्वंतरीच्या रूपानं
जीवदान आनंदानं ll४ll
असे डॉक्टर माणूस
ध्यानीमनी ठेवा जरा
चुकभुल जरा काही
वादविवाद ना खरा ll५ll
माया, प्रेमळ शब्दांनी
दूर वेदना हो करी
शल्य कर्म करुनिया
होई जखम ही बरी ll६ll
नित्य व्यायाम करुनी
घ्यावा पोषक आहार
पथ्थे पाळून थोडके
नियंत्रणात आजार ll७ll
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा