कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
हक्क सांगतो आहे मी
अवघ्या जगाच्या सातबाऱ्यावर
पण कायमच कोऱ्या दिसताय
नोंदी माझ्या खाते उताऱ्यावर
हा कोणता भस्मासुर झालाय
कळेना कसं कधी मला
मी माझ्याच मृत्युची जशी
साध्य करतोय रोज नवी कला
बंदूक, बॉम्ब, विस्फोटके, रणगाडे
अनु, रेणूंची हत्यारे बनवतोय
नोबेल पारितोषिक माझ्याचसाठी
माझाच नाश मला खुनावतोय
जरी माझ्या बाप जाद्यांनी
लढलेय जागतिक महायुद्ध
सांगू शकत नाही छातीठोकपणे
कि त्यांचा हेतू होता शुद्ध
चंद्रावर वस्ती करू म्हणतोय
गृह ताऱ्यांवर ताबा माझा
अवघे विश्व माझ्या अधिपत्याखाली
आकाशगंगेचा मी सार्वभौम राजा
कोरोना नावाच्या व्हायरसने
सळो की पळो केले जगाला
माझ्या अस्तित्वाचा सूक्ष्म पणा
जीवनाचा अर्थ उमगला मनाला
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा